रविंद्र वळवी
मोलगी Molgi ता.अक्कलकुवा
धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी बाधवांचा (Tribal Badhavs) आर्थिक आधार ठरणारा आमचूर उद्योगाला (Amchur industry) यंदा अवकाळीने ब्रेक (Unseasonal break) लावला आहे. या वर्षीच्या वातावरणातील बदलाने व वादळी वार्यांमुळे झाडावरचा मोहोर आणि कैर्या गळून पडत असल्याने उद्योग यंदा महिनाभर लांबणीवर पडला आहे. यातून आंबा उत्पादकांना खूप मोठा आर्थिक फटका (Financial hit) बसला आहे.
सातपुड्याच्या दुर्गम व अतीदुर्गम भागातील आंबा व आमचूर उद्योग हा नंदुरबारमध्येच नाही तर पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. आमचूर हे झाडांवरच्या कैर्यांचे काप तयार करून त्या उन्हात सुकवत त्याचे आमचूर तयार करतात. हा उद्योग मे महिन्यापासून सुरू होतो. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी बाधवांकडून तयार केला जाणारा हा माल राजस्थान, गुजरात आणि उत्तर भारतात पाठवण्यात येतो. यातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. कोरोनाच्या दोन वर्षात व्यापारी न आल्याने आंबा उत्पादकांचे नुकसान झाले होते.
परंतू गेल्या वर्षात मात्र हवामानाने साथ दिल्याने आमचूर उद्योगातून आदिवासी बाधवांना स्थैर्य मिळाले होते. यंदाही झाडावर बहरलेल्या मोहोरमुळे आंबा हंगाम चांगला जाणार अशी अपेक्षा असताना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस आणि वार्याने मोहर व छोट्या आकाराच्या कैर्या गळून पडल्याने परिणामी आमचूर हंगाम सुरु झालेला नाही.
सलग 15 दिवस वातावरणातील बदल कायम राहिल्याने कैर्या गळण्याचे प्रमाण कायम राहिल्याने हंगाम लांबणीवर पडला आहे. नवीन कैर्या येण्यासाठी किमान 20 दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यानंतरच कैरी तोडून तिचे काप बनवत आमचूर बनवणे सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रारंभीच्या काळात झालेल्या नुकसानीमुळे नंतर येणारे उत्पादन हे 15 ते 20 टक्केच राहील असे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना खरीप हंगामातील बियाण्यांसाठी, घरातील लग्नासाठी आधार ठरणारा उद्योगच हातचा गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
प्रशासन आणि राजकीय पुढार्यांकडून दरवेळेस आमचूर प्रकल्पाच्या खोट्या आशा दिल्या जातात, पण कोणीही आमचूर प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत नाही. या भागात तसा प्रकल्प आल्यास लोकांसाठी ते वरदान ठरेल. सध्या 200 रुपये भाव धडगाव बाजारात आमचूर सध्या 150, 180, 260 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी होत आहे. या दरांमध्ये येत्या काळात वाढ होणार आहे.