Saturday, May 9, 2026
Homeदेश विदेशUS-Iran-Israel War: मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद; इराणच्या खार्ग बेटावर अमेरिकेचा भीषण एअर...

US-Iran-Israel War: मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद; इराणच्या खार्ग बेटावर अमेरिकेचा भीषण एअर स्ट्राइक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मध्यपूर्वेतील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा लष्करी तडाखा दिला आहे. अमेरिकेने इराणच्या खर्ग बेटांवर हल्ला केला. अमेरिकेच्या सैन्याने बॉम्बहल्ला करून बेट बेचिराख केल्याचा दावा केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला असून, हा इराणवरील आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी हल्ला मानला जात आहे.

अमेरिका-इस्रायलचा खार्ग आयलँडवरील हल्ला हे युद्धातील सर्वात मोठे पाऊल आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी खर्ग आयलँडला इराणी शासनाचे क्राउन ज्वेल म्हणजे सर्वात किंमती संपत्ती म्हटले. त्यावरुन या बेटाचे महत्व लक्षात येते.

- Advertisement -

ट्रूथवर ट्रम्प यांची माहिती
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, अमेरिकन सैन्याने मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली हवाई हल्ल्यांपैकी एक कारवाई केली. या कारवाईत खार्ग बेटावरील इराणची सर्व लष्करी लक्ष्ये नष्ट करण्यात आली. मात्र तेल उद्योगावर परिणाम होऊ नये म्हणून तेल पायाभूत सुविधांवर हल्ला न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम
उत्तर युरोपमधील मोठी वित्तीय सेवा कंपनी Skandinaviska Enskilda Banken (SEB) च्या विश्लेषकांनी यापूर्वीच इशारा दिला होता की खार्ग बेटावरील निर्यात टर्मिनल्सना नुकसान झाले तर जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले होते.

हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेने जारी केलेल्या व्हिडीओत खार्ग बेटांवरील लष्करी तळांवर अतिशय निवडकपणे कशा पद्धतीने हल्ले केले गेले हे दाखवले गेले आहे. पूर्ण व्हिडीओ सुमारे १ मिनिट ०४ सेकंदांचा असून त्या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्रे पडताना दिसत आहेत. अमेरिकेने इशारा दिला आहे की जर इराण किंवा इतर कोणत्याही देशाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या मुक्त आणि सुरक्षित मार्गात अडथळा आणला, तर आम्ही ताबडतोब पुढील कारवाई करू आणि खर्ग बेटांवरील उर्वरित पायाभूत सुविधाही नष्ट करू.

दरम्यान, २ मार्चपासून Strait of Hormuz ही महत्त्वाची समुद्री वाहतूक मार्गिका बंद असल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजार आधीच अडचणीत आला आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक होत असते. मात्र सध्या जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

भारताला मोठा धोका
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्याला इराणचं ‘क्राउन ज्वेल’ म्हणतात, अशा ठिकाणी त्यांनी हल्ला केलाय. मग, उद्या इराणने यावर प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला, तर जगासह भारतासमोर मोठ तेल, एलपीजीच संकट येऊ शकतं. स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक करणाऱ्या प्रत्येक जहाजाला इराणने लक्ष्य केलं तर इथून एकही जहाज जाणार नाही. आता इराणने भारताच्या काही तेल जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून येण्याची परवानगी दिली आहे. पण यापुढे ते परवानगी देणार नाहीत तसच इराणकडून सौदी अरेबिया, बहरीन, कुवैत, कतार, ओमान येथील तेल प्रकल्पांवरील हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. बदला म्हणून त्यांनी आखाती देशातील तेल प्रकल्पांवर हल्ले केले तर सगळी तेल निर्मितीच ठप्प होईल.

ताज्या बातम्या

संपादकीय : ९ मे २०२६ – राजभवनाचा राजकीय अडथळा

0
तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालानंतर दक्षिण भारताच्या राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. सुपरस्टार विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने १०८ जागा जिंकून तामिळनाडूच्या...