Saturday, March 29, 2025
Homeदेश विदेशअमेरिकेचा पुन्हा इराकवर हवाई हल्ला

अमेरिकेचा पुन्हा इराकवर हवाई हल्ला

pc:world news 

वृत्तसंस्था : अमेरिकेकडून पुन्हा इराकवर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

आज पहाटेच्या सुमारास उत्तरी बगदादमध्ये हा हल्ला करण्यात आला. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या हवाई हल्ल्यात इराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबीच्या काही लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. हश्द अल शाबी हा इराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे.

बगदादमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे या वाहनातून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जळून मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात हश्द अल शाबीच्या एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आशियायी देशांवर हल्ल्याचा परिणाम

हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील वातावरण संतप्त झाले असून इंधनाच्या किंमतीही वाढल्या आहेत. सुलेमानीच्या मृत्यूच्या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किंमतींमध्ये 1.31 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक बॅरलची किंमत 67.12 डॉलरवर पोहोचली आहे. तर अमेरिकन क्रूडच्या किंमतीतही 1.24 टक्क्यांची वाढ झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, रविवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. नागपूरमध्ये आयोजित विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबरोबर पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे...