Thursday, April 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAmerica-China Tariff War : व्यापार युद्धाचा भडका; चीनचे अमेरिकेवर ८४ टक्के आयात...

America-China Tariff War : व्यापार युद्धाचा भडका; चीनचे अमेरिकेवर ८४ टक्के आयात शुल्क

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचा फटका अनेक देशांना बसत आहे. अनेक देशांच्या शेअर बाजारावरही त्याचा परिणाम होत आहे. यातच अमेरिका आणि चीन (America and China) यांच्यातील व्यापार युद्ध आणखी तीव्र झाले असून चीनने अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

अमेरिकेने चीनवर आधी ३४ टक्के आयात शुल्क लावले होते. त्यानंतर चीननेही अमेरिकन वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयात शुल्क लावले होते. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा चिनी मालावर १०४ टक्के आयात शुल्क (Import Duty) लादण्याची घोषणा केली. त्यामुळे चीनला मोठा धक्का बसला. यानंतर आता चीननेही मोठी घोषणा करत अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के वाढीव आयात कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात बोलताना चीनच्या अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) म्हटले आहे की, अमेरिकन वस्तूंवर लावण्यात आलेले हे अतिरिक्त टॅरिफ १० एप्रिलपासून लागू होईल. यापूर्वी चीनने अमेरिकन उत्पादनांवर ३४ टक्के टॅरिफ लावण्यासंदर्भात भाष्य केले होते. मात्र आता ते वाढून ८४ टक्के करण्यात आले आहे. याशिवाय, चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही १२ अमेरिकन संस्थांना निर्यात नियंत्रण यादीत टाकले आहे. याशिवाय, ६ अमेरिकन कंपन्यांना अविश्वसनीय संस्थांच्या यादीत समाविष्ट केले आहे.

या घोषणेनंतर, यूएस स्टॉक इंडेक्स फ्युचर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. तत्पूर्वी, ट्रम्प प्रशासनाने काल चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १०४ टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. हे शुल्क ९ एप्रिल (बुधवार) पासून लागू होईल, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीने म्हटले होते. व्यापार युद्ध आणखी तीव्र चीन आणि अमेरिका यांच्यातील हे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध टीट-फॉर-टॅट धोरण अवलंबले आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत आहे.

आशियाई शेअर बाजार पुन्हा कोसळले

व्हाईट हाऊस चिनी मालाच्या आयातीवर १०४ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात कर लादण्यासह इतर देशांवर लावण्यात येत असलेले व्यापार शुल्क यामुळे आशियाई बाजार बुधवारी पुन्हा एकदा कोसळल्याचे पाहायला मिळले. सकाळच्या सत्रात जपानचा निक्की २२५ निर्देशांक जवळपास ४ टक्क्यांनी घसरला तर दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथेदेखील घसरण पाहायला मिळाली, यासंबंधीचे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे. चीनचा ब्लू चीप्स निर्देशांक १.२ टक्क्यांनी तर हाँगकाँगचा हँग सँग निर्देशांक हा ३.१ टक्के खाली गेला. एमएससीआयचा ब्रॉडेस्ट इंडेक्स ऑफ अशिया-पॅसिफिक शेअर्स जपानच्या बाहेर १.७ टक्क्यांनी कोसळला.

चीनने अमेरिकेवर वाढवलेले शुल्क ही एक चूक आहे. जी चीनच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे गंभीर उल्लंघन करते आणि नियमांवर आधारित बहपक्षीय व्यापार प्रणालीला गंभीरपणे कमकुवत करते.

अर्थ मंत्रालय, चीन

है दुर्देवी आहे. तसेक चीनने व्यापार युद्धातून बाहेर पडण्यासाठी अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करू नये. याबरोबरच बीजिंगने चर्चेसाठी एकत्र यावे याऐवजी चीनने फेंटानिलची अमेरिकेत निर्यात करणाऱ्यांना शिक्षा करणे गरजेचे आहे. हा मुद्दा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बराच काळापासून उपस्थित करत आहेत.

स्कॉट बेसेंट, अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अखेर ट्रम्प यांची माघार; टॅरिफला ९० दिवसांचा दिला पॉझ, भारताला मोठा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiगेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेल्या टॅरिफ प्लानमुळे नव्या संकटात सापडले. यामुळे जागतिक...