Monday, June 17, 2024
Homeदेश विदेशविमानात पुन्हा किळसवाणा प्रकार! मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर केली लघुशंका

विमानात पुन्हा किळसवाणा प्रकार! मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर केली लघुशंका

दिल्ली | Delhi

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शंकर मिश्रा नावाच्या एका तरुणाने एअर इंडिया फ्लाइटने न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असताना एका सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असताना हा प्रकार घडला होता.

ही घटना ताजी असताना आता अमेरिकन एअरलाइन्समध्ये असाच प्रकार घडला आहे. न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने बसलेल्या ठिकाणीच लघुशंका केली आहे. यानंतर तो सहप्रवाशाच्या अंगावर पडला आहे.

Accident : वाढदिवच्या सिलिब्रेशनला गेले ते परतलेच नाही; भीषण अपघातात ६ मित्रांचा जागीच मृत्यू

ही घटना AA292 या अमेरिकन एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये घडली आहे. या फ्लाईटने शुक्रवारी सव्वा नऊ वाजता न्यूयॉर्कवरुन उड्डाण घेतलं. १४ तासांच्या प्रवासानंतर शनिवारी ४ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता हे विमान दिल्लीतल्या आयजीआय एअरपोर्टवर उतरलं.

दुप्पट पैशांचे आमिष; प्राध्यापक-शिक्षिका दाम्पत्यास ४५ लाखांना गंडा

घटनेतला आरोपी हा अमेरिकेतल्या एका विद्यापीठात शिक्षण घेतो. प्रवासादरम्यान नशेमध्ये असतांना त्याने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. त्याननंतर त्या सहप्रवाशाने त्याची तक्रार केली.

…म्हणून माझ्यावर हल्ला झाला; संदीप देशपांडेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

दरम्यान या घटनेनंतर त्या मुलाने सहप्रवाशाची माफी मागितली आहे. आणि सहप्रवाशानेही आपलं नाव उघड न करण्याचं तसेच आपण तक्रारही न करणार असल्याचं म्हटलं आहे. मुलाने माफी मागितली आहे आणि त्याच्या करियरवर पुढे परिणाम होऊ नये म्हणून तक्रार करत नसल्याचं म्हटलं आहे.

अभिनेत्री Tunisha Sharma च्या आत्महत्या प्रकरणात शिझान खानला जामीन मंजूर

मात्र एअरलाईन कडून हा प्रकार गांभिर्याने घेतला जात आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर ATC ला देण्यात आली. त्यांच्याकडून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोपीला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या