Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशQUAD ची आज बैठक; जो बिडेन, स्कॉट मॉरिसन यांच्यासह पंतप्रधान मोदी होणार...

QUAD ची आज बैठक; जो बिडेन, स्कॉट मॉरिसन यांच्यासह पंतप्रधान मोदी होणार सहभागी

दिल्ली l Delhi

युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू (Ukrain-Rassia War) असलेल्या युद्धादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden), ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्यासोबत क्वाड (Quad Meeting 2022) नेत्यांच्या आभासी बैठकीत सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

या बैठकीमध्ये ते इंडो-पॅसिफिकमधील महत्त्वाच्या चर्चा करणार आहेत. क्वाड लीडर्स या बैठकीमध्ये क्वाडच्या अजेंडाचा भाग म्हणून घोषित केलेल्या बाबींसाठी झालेल्या प्रयत्नांचा देखील आढावा घेणार आहेत. क्वाड या संघटनेतील हे चार देश हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता कायम रहावी आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रयत्नशील असतात.

तसेच या बैठकीत रशिया-युक्रेन मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा दावा रशियाने केल्यानंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवले असल्याची माहिती मिळाली नसल्याचे परराष्ट्र मंत्र्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले. एका निवदेनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. युक्रेन सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांना सहकार्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या