Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या‘अमित शाह हे गुजरातचे असले तरी त्यांच महाराष्ट्रावर प्रेम, कारण…’, अजितदादांची फटकेबाजी

‘अमित शाह हे गुजरातचे असले तरी त्यांच महाराष्ट्रावर प्रेम, कारण…’, अजितदादांची फटकेबाजी

पुणे । Pune

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आले आहेत. केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत व्यासपीठावर अजित पवार एकत्र आले. यावेळी पवार यांनी शाह यांचं कौतुक केलं.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, देशात सहकार क्षेत्राचा मोठा इतिहास आहे. सहकार ग्रामीण भागापासून शहरात पोहोचला आहे. सहकार विभागाचे देशात मोठ योगदान दिलं आहे. देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय सुरू करण्यात आलं आहे. सहकार क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे प्रत्येक गावात पोहोचले आहे. अमित शाह गुजरातमधून येतात पण त्यांच महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. त्याच कारण म्हणजे ते महाराष्ट्राचे जावाई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम होत असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे, असेही अजित पवार यांनी सांगितलं.

अमित शहांनी CRCS डिजिटल पोर्टलच्या उद्घाटनासाठी पुणे का निवडलं? फडणवीसांनी सांगितलं कारण

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मी देखील एका कारखान्याचे नेतृत्व करतो, तिथे आधी FRP मिळत होती २८५० रुपये. पण आता काल मी त्याचा भाव पाहिला तर तो भाव ३३५० रुपये मिळाला आहे. केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्ष प्रयत्न करत होतो. कोणी ही डेरिंग केलं नाही. हे डेरिंग फक्त अमित शहांनी करुन दाखवलं. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. तसेच त्यांच्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळत आहे.

यावेळी अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचे कारण देत सांगितले की, कधी कधी सगळ्यांना प्रश्न पडतो की, अजित पवारांनी असा निर्णय का घेतला? कारण त्यांच्या नेतृत्वामुळे. मोठे निर्णय घेण्याचे धाडस फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये आहे. तेच तुमच्या माझ्या देशाला नेतृत्व देऊ शकतात, असेही अजित पवारांकडून यावेळी सांगण्यात आले. आज ५०८ रेल्वे स्टेशनच्या नुतनीकरणाच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. यात पुण्यातील दोन रेल्वे स्थानकांचा तर महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. याच्या आधीच्या काळामध्ये अशा प्रकारचे धाडस कुणी दाखवले नव्हते. गेल्या नऊ वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारची सुट्टी घेतली नाही. अशा प्रकारचे पंतप्रधान मी मागच्या कुठल्या काळात पाहिले नाही. मला कोणत्याही पंतप्रधानांचा अपमान करायचा नाही. पण फक्त नरेंद्र मोदीच हे करू शकतात. आज देशाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही. जगामध्ये मान्य झालेले ते नेतृत्व आहे आणि आज अमित शहा देखील तितक्याच तडफेने काम करतात. मी देखील एखादे काम त्यांना सांगितल्यानंतर ताबडतोब त्याचा निकाल लागतो, असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांचे देखील कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या