Saturday, March 29, 2025
Homeदेश विदेशदिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस जबाबदार – शाह

दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस जबाबदार – शाह

नवी दिल्ली – दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे तुकडे गँगने दिल्लीत अशांतता पसरवली असेही ते म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.

दिल्लीत गुरूवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री शाह यांनी केजरीवाल सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधी पक्षांनी दिल्लीच्या जनतेची दिशाभूल केली आहे. दिल्लीची शांतता भंग केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँग दिल्लीच्या अशांततेला जबाबदार आहे. दिल्लीच्या जनेतेने त्यांना दंड दिला पाहिजे.

- Advertisement -

केजरीवाल सरकार विकास कामात अडथळा निर्माण करण्याचे काम करते असा आरोप केला. केजरीवाल फक्त जाहिराती देऊन लोकांना फसवत आहेत. जीवनात त्यांना फक्त विरोध करणे आणि धरणे आंदोलन करण्याशिवाय दुसरे कामच येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : समृद्धी महामार्गावर अपघात; दोन ठार, २ जखमी

0
वावी | वार्ताहर | Vavi समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) झालेल्या अपघातात (Accident) दोन जण ठार (Killed) झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली...