Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याअमित ठाकरे नाशिक जिल्हा दौऱ्यावर

अमित ठाकरे नाशिक जिल्हा दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीकरीता ‘महासंवाद यात्रे’ निमित्त ०४ दिवसांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

- Advertisement -

मंगळवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता अमित ठाकरे यांचे इगतपुरी येथे आगमन होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाल्यानंतर अमित ठाकरे यांचा हा पहिलाच नाशिक दौरा असून राज्यातील बदलणाऱ्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहर व जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनविसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये या दौऱ्याबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या