Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAmit Thackeray: "कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर…"; गुन्हा दाखल...

Amit Thackeray: “कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर…”; गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी रविवारी नवी मुंबईतील नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. चार महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त लोकार्पणासाठी नेता मिळत नाही म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला होता. याची माहिती मिळताच अमित ठाकरे यांनी त्याचे उद्घाटन केले. अमितने त्याचे अनावरण करून सन्मान राखला, तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल करता? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. ही दादागिरी मोडून काढू असाही इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी, कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे असे अमित ठाकरे म्हणाले.

अमित ठाकरे यांच्यावर आतापर्यंतचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिलाच गुन्हा हा महाराजांसाठी दाखल झाला हे चांगले झाले असे अमित ठाकरे म्हणाले. कबुतरांपेक्षा शिवाजी महाराज यांच्यासाठी गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे असेही ते म्हणाले. मला बरं वाटतेय. काल दिघा आणि कोपर खैराणेला गेलेलो. गजानन काळे सोबत होते. त्यांनी सांगीतले की महाराजांचा पुतळा आहे पण चार महिने अनेक आंदोलने करून देखील खुला केला नाही. काल त्या ठिकाणी मी गेलो आणि उद्घाटन केले.

- Advertisement -

पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, महाराजांसाठी मराठी माणूस पेटून उठतो. गेल्या चार महिन्यात ते एअरपोर्टला गेले दहीहंडीला गेले पण त्यांना उदघाटन करायला वेळ नाही मिळाला. त्यांनी पुन्हा कपडा बांधला तर आम्ही पुन्हा ओपन करू. पुतळा लोकांना दर्शनासाठी खुला केला आहे. पोलिसांचे काम आहे, त्यांना मी काही बोलणार नाही कारण पोलिसांवर वरून प्रेशर असतो.

YouTube video player

राज ठाकरेंच्या घरात वाढलो आहे…
राज ठाकरे यांच्या घरात वाढलो आहे, त्यामुळे याला कोर्टात सामोरे जाईन असे अमित ठाकरे म्हणाले. तसेच राज ठाकरेंना ही गोष्ट समजली तेव्हा ते फक्त हसले असेही अमित ठाकरे म्हणाले. गेल्या चार महिन्यांपासून हा पुतळा झाकून आहे. पंतप्रधान मुंबईत आले, त्यांनी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटनही केले. दहिहंडीच्या दिवशी अनेक नेते आले, जाहिरातबाजी केली. पण एकानेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले नाही. त्यामुळे आम्ही त्या पुतळ्याचे अनावरण केले असे अमित ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंची समर्थनार्थ पोस्ट
आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने, त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता?

मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची!

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

सुरेश

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन; वयाच्या ८२व्या वर्षी घेतला अखेरचा...

0
पुणे | Puneकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी 2026) पुण्यातील वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने...