Tuesday, March 25, 2025
Homeजळगावप्रचारादरम्यान अमोल जावळे यांनी साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

प्रचारादरम्यान अमोल जावळे यांनी साधला ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

रावेर । प्रतिनिधी

रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही विस्तृत ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे, ज्यात प्रत्येक समाजाच्या प्रगतीची पूर्ण हमी आहे. मतदारांचा आशीर्वाद मिळाल्यास रावेरचा चेहरा बदलून दाखवू. मला एक संधी द्या, आपण सर्वांच्या विकासाचे स्वप्न साकार करू, असे महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे म्हणाले.

- Advertisement -

अमोल जावळे यांनी आज यावल तालुक्यातील अंजाळे, टाकरखेडा, वाघळूद, चिखली, बोरावलं, भालशिव, पिप्री, निमगाव, राजोरा आणि रावेर तालुक्यातील रसलपूर, भातखेडा, रमजीपूर, खिरोदा प्रगणे रावेर, बक्षीपूर आदी गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार केला. गावोगावी रांगोळ्या काढून मतदारांनी जावळे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
सध्याचे आमदार म्हणतात की, त्यांना निधी मिळाला नाही. पण प्रत्यक्षात सरकार प्रत्येक आमदाराला निधी देतेच. आमदार म्हणून मतदारसंघाचा अभ्यास करून कुठे काय आवश्यक आहे, त्यानुसार प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठवणे ही जबाबदारी असते. मात्र, सध्याच्या आमदारांना यासाठी वेळच नव्हता. त्यांनी केवळ स्वतःच्या संस्थांवर लक्ष केंद्रित केले, जनतेकडे दुर्लक्ष केले, आणि केवळ नातलगांच्या कामांसाठीच प्रयत्न केले. आता त्यांचे सुपुत्र उमेदवार आहेत, पण त्यांचाही दृष्टिकोन त्याच दिशेने जाणार आहे, त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसेल. मी मात्र भाजपचा विचार, विकासाची परंपरा, आणि संपूर्ण मतदारसंघाच्या समतोल विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. माझ्या प्रचारात भाजपसह शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजितदादा गट), रिपब्लिकन पक्ष आदी पक्षांचे कार्यकर्ते मनापासून सहभागी झाले आहेत.

पक्षाचे नेतृत्व, कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांचा आशीर्वाद यांच्या बळावर मी विजय मिळवणारच, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असे अमोल जावळे यांनी ठामपणे सांगितले. यावेळी सुरेश धनके, हिरालाल चौधरी, पी.के. महाजन, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, गोपाळ नेमाडे, सागर भारंबे, हरलाल कोळी, अहमद तडवी, जितू पाटील, उमाकांत महाजन, मिलिंद वायकोळे, महेश पाटील, विजय महाजन, रवींद्र पाटील, महेश चौधरी, चेतन पाटील, राजेंद्र पाटील, सुनील महाजन, लीलाधर महाजन, सुनील पाटील, वासुदेव नरवाडे, गौरव पाटील आणि वाय. डी. पाटील यांसह महायुतीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...