Thursday, July 4, 2024
Homeराजकीय"महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण, त्यांनी आंबेडकरांसोबत…"; NCP नेत्याचं खळबळजनक विधान

“महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण, त्यांनी आंबेडकरांसोबत…”; NCP नेत्याचं खळबळजनक विधान

मुंबई | Mumbai

- Advertisement -

देशात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. यामध्ये महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार गटावर टीका झाली. त्यामुळे महायुतीत अजित पवार गटाला एकटं पाडलं जात आहे, असा आरोप काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

अमोल मिटकरी यांनी एका वृत्त वहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं आणि वंचितसोबत जावं, असे मोठं विधान केले आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वता:ची कारकिर्द सुरू केली. लोकसभेत त्यांना महाविकास आघाडीने छळलं, त्यांची स्वता: सांगितलं. संजय राऊत यांनी त्यांना कसं छळलं, नाना पटोले बोलले. त्यापेक्षा आमच्या सारख्या फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला व्यथा होणे सहाजिक आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

अमोल मिटकरी पुढे म्हणाले, नव्या युतीबाबत आपलं वैयक्तिक मत आहे. तरी पक्षाने यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत अजित पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी काहीही करून महायुती सोडावी, यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही नेते प्रयत्न करत आहेत, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप मिटकरींनी केला. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील, असा आशावादही मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या