Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याMitkari vs Awhad : मिटकरींनी दिलेलं चॅलेंज आव्हाडांनी स्वीकारलं; 'तुतारी' वाजवली, पण...

Mitkari vs Awhad : मिटकरींनी दिलेलं चॅलेंज आव्हाडांनी स्वीकारलं; ‘तुतारी’ वाजवली, पण चेक लिहितांना झाला गोंधळ

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाकडून (Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे. त्यानंतर आज या चिन्हाचे शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते रायगडावर अनावरण करण्यात आले. मात्र, या ‘तुतारी’ चिन्हावरून अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या पक्षाला डिवचले जात आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (MLA Amol Mitkari) शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) आव्हान दिले आहे…

- Advertisement -

आमदार अमोल मिटकरींनी “आव्हाडांनी तुतारी फुंकून दाखवावी मी १ लाख रुपये देतो”, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आज रायगडावर (Raigad) शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ या चिन्हाचे अनावरण होण्यावेळी आव्हाडांनी तुतारी वाजवून मिटकरींचे आव्हान स्विकारल्याची चर्चा सुरू होती. यानंतर अमोल मिटकरी यांनी आव्हाडांनी एकट्याने तुतारी वाजवून दाखवावी आणि तयार असलेला एक लाखाचा चेक घेऊन जावा असे म्हणत दुसऱ्यांदा आव्हान (challenge) दिले आहे.

Nashik Water Storage : जिल्ह्याला ऐन फेब्रुवारीत पाणी टंचाईच्या झळा; कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मिटकरींनी आव्हाडांचा तुतारी वाजवताना व्हिडीओ दाखवत त्यांचे पोट पुढे आल्याचे म्हटले आहे. तसेच मागचे तुतारी वादक तुतारी वाजवत आहेत.आव्हाडांनी माझं आव्हान स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे. एक लाखांचा चेक तयार आहे. त्यांनी तुतारी आणावी आणि पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि एक लाख घेऊन जावेत, असे म्हटले. यावेळी मिटकरींनी व्हिडीओवरती चेक देखील दाखवला. परंतु, मिटकरींनी दाखवलेल्या चेकमध्ये मोठी चूक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता मिटकरी हे चेक लिहिण्याच्या पद्धतीवरून चर्चेत आले आहेत.

दरम्यान, मिटकरींनी आव्हाडांसाठी तयार केलेल्या चेकमध्ये पेई अर्थात ज्याच्या नावे धनादेश काढला जातो, तिथे रक्कम लिहिली आहे. तर जिथे रक्कम लिहायची तिथे जितेंद्र आव्हाडांचे नाव लिहिले आहे. त्यामुळे मिटकरींनी हा चेक लिहितांना केलेल्या चुकीची सध्या राजकीय (Political) वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Nashik Crime News : स्वत:वर गोळी झाडून दुय्यम पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...