Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Crime News: लष्करात ड्रग्जचा पुरवठा ? देवळाली कॅम्पला २४ लाखांचे 'ॲम्फेटामाइन'...

Nashik Crime News: लष्करात ड्रग्जचा पुरवठा ? देवळाली कॅम्पला २४ लाखांचे ‘ॲम्फेटामाइन’ जप्त; तिघे एजंट अटक

नाशिक | प्रतिनिधी
पाच हजार रुपयांत केवळ एक ग्रॅम व पन्नास लाख रुपये प्रतिकिलोने चोरीछुपे मिळणारे ‘ॲम्फेटामाईन’ हे ड्रग्ज थेट देवळाली कॅम्पच्या लष्करी कार्यालयाजवळच जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

शहरासह जिल्ह्यात मॅफड्रोन (एमडी), गांजा व गुटख्याची तस्करी सुरू असताना लष्करी तळापर्यंत आता ‘नशेचा हायडोस’ सुरू असल्याचे धक्कादायक समोर आले आहे. शहर पोलिसांच्या पथकांनी मिलिटरी प्रवेशद्वारासमोर असलेल्या कॅथे कॉलनीत टाकलेल्या छाप्यात ‘ॲम्फेटामाइन’ हा चोवीस लाखांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. यात तिघांना अटक केली असून त्यांनी लष्करी कार्यालयात मजुरीचे काम केल्याचे समोर आले असून ड्रग्जचा पुरवठा केल्याचा संशय पडताळला जात आहे. हे सर्वच संशयित मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील आहेत. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील अंमलदार राजेंद्र गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

Nashik Municipal Election: नाशकात प्रचार तोफा धडाडणार; ठाकरे बंधूंची आज संयुक्त सभा

त्यानुसार मुन्ना कल्लू कोल (वय ४०), शांती मुन्ना कोल (३३), अमर मुन्ना कोल (१९, सर्व रा. सतना, मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. ते मजूर असून काही महिन्यांपासून देवळाली कॅम्प पोलिसांच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. ८) पहाटे पाच वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प पोलीस व अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) छापा टाकला. त्यावेळी कोल याच्या लेबर रूममध्ये गांजा आणि ॲम्फेटामाईन या अमली पदार्थांचा साठा आढळून आला.

देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या पथकासह एनडीपीएसनुसार ही कारवाई केली आहे. तपासानुसार, हे अमली पदार्थ लष्करी छावणी परिसरातील काही जवानांपर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. लष्करातील व्यक्तींना हे पदार्थ पोहोचल्याचे समजल्यानंतर सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांना कळवले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

दृष्टीक्षेपात
लष्कराच्या ‘इंटेलिजन्स ब्युरो’नेही घेतली दखल
एमडीनंतर ‘ॲम्फेटामाइन’ बाजारात
२६.५ ग्रॅम वजनापेक्षा जास्त ‘अॅम्फेटामाइन’ जप्त
२४ लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल
‘एनडीपीएस’ची अतिरिक्त कुमक रवाना

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...