पुणे । Pune
पुणे शहरात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी म्हणजे २४ जुलै रोजी पहाटे ४ वाजता घडली. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याने हे कृत्य का केला? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना चौकशीनंतर मिळणार आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
VIDEO : ३ वर्षीय चिमुकला बोअरवेलमध्ये पडला, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब पुणे शहरात वास्तव्यास आहे. सोमावारी पहाटे चार वाजता त्यांनी पत्नीचा खून केला. त्यानंतर पुतण्यावर गोळी झाडली. या दोघांच्या खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मोनी गायकवाड (वय 44) ही भरत गायकवाड यांची पत्नी आहे तर दीपक गायकवाड (वय 35) हा त्यांचा पुतण्या आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. भरत गायकवाड यांचे कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला होते. नेमकी ही हत्या करण्याचे आणि त्यानंतर आत्महत्या का केली? घटनास्थळी त्यांनी काही चिठ्ठी लिहिली आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतर मिळणार आहे.