Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याअमरावती हिंसाचार : ऑडिओ क्लिप शेअर करत नवाब मलिकांचा भाजपावर निशाणा

अमरावती हिंसाचार : ऑडिओ क्लिप शेअर करत नवाब मलिकांचा भाजपावर निशाणा

मुंबई | Mumbai

त्रिपुरा (tripura violence) येथील कथित घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी अमरावतीमध्ये (amravati) आंदोलन करण्यात आले. याच घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी काही हिंदूत्ववादी संघटना आणि भाजपने (BJP) शहर बंदची हाक दिली होती.

- Advertisement -

या बंदला हिंसक वळण लागले. यामध्ये दुकाने फोडण्यात आली. अनेक दुकानांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक देखील झाली. अमरावती हिंसाचारप्रकरणी (amravati violence) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी भाजप नेत्यावर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी एक नवी ऑडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. यामध्ये अनिल बोंडे (Anil bonde) यांचा आवाज असल्याचा मालिकांचा दावा आहे. यात अनिल बोंड अमरावतीमध्ये झालेल्या दंगली (Amravati Violence) संदर्भात बोलताना दिसत आहे. त्यावर “झूट बोले कव्वा काटे” असं म्हणत म्हणत नवाब मलिक यांनी टीका केली आहे. मलिकांच्या या व्हिडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा वादंग होणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान अमरावती शहरात जो हिंसाचार उसळला त्यामुळे शहरात गेल्या पाच दिवसापासून संचार बंदी लावण्यात आलेली आहे. तसेच शहरातील सर्व इंटरनेट सेवा पूर्णता बंद करण्यात आली आहे, यामुळे शहरातील बँक पूर्णपणे बंद आहेत. सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प झालेले आहेत. सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून आज दुपारी बारा ते चार या वेळात संचार बंदीमध्ये चार तासाची सूट देण्यात आलेली आहे. मात्र संचारबंदी व इंटरनेट सुविधा बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात झळ पोहोचत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या