धुळे । Dhule
माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल (Former minister Amrishbhai Patel) यांच्या नेतृत्वाखाली श्री विले पार्ले केळवाणी मंडळ मुंबईच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. आ. अमरिशभाई पटेल यांची पुनश्च अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड झाली.
श्री विलेपार्ले केळवाणी मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विलेपार्ले-मुंबई व शिरपूर कॅम्पस या दोन ठिकाणी मतदान घेण्यात आले. त्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला. श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ अध्यक्ष पदासाठी आ. अमरिशभाई रसिकलाल पटेल यांना भरघोस 1685 मते मिळालीत.
ट्रस्टी सहा पदांसाठी उमेदवारनिहाय मिळालेले मतदान पुढील प्रमाणे : आ. अमरिशभाई पटेल यांना 1693 मते, भूपेशभाई रसिकलाल पटेल 1685, चिंतन अमरिशभाई पटेल 1674, स्नेहा ए. पारेख 1669, भरत एम. संघवी 1656, हर्षद एच. शाह 1652.
मॅनेजिंग कमिटीच्या 30 सदस्य यांना मिळालेली मते: गांधी जयंत पी. 1645, मेहता किरीट पी. 1644, चोकसी जयेश पी. 1643, चितलिया हरित एच. 1640, दोशी प्रविण एच. 1639, किल्लावाला जगत ए. 1633, पटेल नयन एम. 1631, पारेख स्नेहा ए. 1629, मेहता तुषार एच. 1627, दिवतिया सुनंदन आर. 1626, पटेल भार्गव एन. 1625, पटेल मुकेश एच. 1625, पारिख जगदिश बी. 1624, शेठ अमित बी. 1621, देसाई संजय ए. 1619, पटेल मुकुल पी. 1619, पटेल हरीष जे. 1618, शाह हर्षद एच. 1618, भिमानी जतिन 1616, भंडारी राजगोपाल सी. 1615, वैद्य विवेक सी. 1615, शाह पृथ्वीराज सी. 1614, शेठ नरेश के. 1612, दुदेजा रणजीत 1610, शाह मुकेश ए. 1610, पटेल महेरदास जे. 1609, कावा हर्षद बी. 1608, पटेल वैभव सी. 1607, शाह विशाल एच. 1607, पटेल विनोद एम. 1606.
श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ चे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल यांनी संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचे मोठे जाळे विणले आहे. देशभरात अनेक शैक्षणिक दालने सुरू करून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले.