मुंबई | Mumbai
काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे.MIDC ची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली. मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी एखादा व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का?, असा सवाल खडसे यांनी केला होता. यास आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या..
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही. सर्वांचे भले होवो.” असा टोला त्यांनी लगावला आहे.
फडणवीस म्हणाले होते…
एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लीन चिट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनामा द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला.” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.