Monday, June 17, 2024
Homeनगरशहराला नियोजनबद्ध दररोज पाणीपुरवठा केला जाईल - आ. जगताप

शहराला नियोजनबद्ध दररोज पाणीपुरवठा केला जाईल – आ. जगताप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने नगर शहराला पाणीपुरवठा करणारी अमृत पाणी योजनेचे (Amrut Pani Yojana) काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या मे महिन्या अखेर ही सर्व कामे पूर्ण होऊन दररोज नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला जाईल. सन 19 72 साली मुळा धरणातून नगर शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणार्‍या योजनेचे काम पूर्ण झाले. आता अमृत पाणी योजनेच्या (Amrut Pani Yojana) माध्यमातून दुसर्‍या पाणी योजनेचे पूर्ण होणार आहे.

नगर शहर विकास कामातून महानगराकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे शहराच्या उपनगरांमध्ये नागरी वसाहती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. टप्प्याटप्प्याने विकासाचे एक एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावली जात आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केले आहे.

विळद पंपिंग हाऊस (Vilad Pumping House) येथे अमृत पाणी योजनेचे पंप व मोटार बसवण्याच्या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, मनपा सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, जल अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की, नगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम मुळा धरण पंपिंग हाऊस ते विळद पंपिंग हाऊस यादरम्यान 1100 एमएम व्यासाची पाईपलाईन टाकून झाली आहे. याचबरोबर विळद पंपिंग हाऊस ते वसंत टेकडी पर्यंत 1100 एमएम व्यासाची नवीन पाईपलाईन टाकून झाली आहे. वसंत टेकडी येथे 50 लाख लिटर क्षमतेची टाकीचे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर विळद जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन 45 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे.

विळद येथे पंप व मोटार बसवण्याचे काम अपूर्ण होते आता हे काम प्रगतीपथावर आले असून 600 एचपीचे तीन पंप बसवण्यात आले आहे. याचबरोबर 600 एचपीचे तीन मोटर बसवण्याचे काम सुरू आहे पॅनल, स्टार्टर, सबस्टेशन उभारण्यात आले असून ही सर्व कामे मे महिना अखेर पूर्ण होईल व नगर शहराला नियोजनबद्ध दररोज पाणीपुरवठा कसा करता येईल यासाठी उपाययोजना केल्या जाईल.

नगर शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था याचबरोबर फेज टू पाण्याच्या टाक्या व पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जाईल असे ते म्हणाले. यावेळी जल अभियंता परिमल निकम यांनी योजनेची माहिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या