Wednesday, April 30, 2025
Homeमनोरंजन“अज मैं मूड बणा…”! अमृता फडणवीसांचं नवं गाणं लवकरच... नव्या लूकची...

“अज मैं मूड बणा…”! अमृता फडणवीसांचं नवं गाणं लवकरच… नव्या लूकची होतेय चर्चा

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बँकर अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती खुद्द अमृता फडणवीस यांनी दिली आहे. सोशल मीडियावरून अमृता फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या नवीन गाण्याचे बोल ‘आज मै मूड बना लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे’, असे असणार आहेत. ‘टी सीरिज’चं हे गाणं येत्या ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

या गाण्यातील अमृता फडणवीस यांच्या लूकचा फोटोही सोबत शेअर करण्यात आला आहे. यात त्या निळी जिन्स आणि पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतात. यावर त्यांनी गुलाबी रंगाचा ओव्हरकोट परिधान केला आहे. सोबत या ट्रेंडी लूकसोबत त्यांनी पारंपरिक दागिन्यांचे फ्युजन आपल्या लूकला दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या या नव्या लूकचीही बरिच चर्चा बघायला मिळत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘प्रवरे’च्या आजी-माजी संचालकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन...