“राज्यपाल मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले…”; शिवरायांबाबत केलेल्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळं सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत.

राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी सुद्धा राज्यपालांना खडेबोल सुनावले आहे. तर कोश्यारींविरोधात शिवप्रेमींनी राज्यभरात आंदोलनही केली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

अमृता फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. ‘मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. ‘ अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. मराठीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत. मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. असे अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *