Friday, May 16, 2025
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये राष्ट्रवादीला धक्का! अमृता पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमध्ये राष्ट्रवादीला धक्का! अमृता पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिक | Nashik

- Advertisement -

दिवंगत माजी आमदार वसंतराव पवार (Vasantrao Pawar) यांच्या कन्या अमृता पवार (Amruta Pawar) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने  नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह अन्य महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमृता पवार (Amruta Pawar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP) शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भाजपकडे जाण्याचा कल राज्यात वाढला आहे तोच कल नाशिकमध्येही दिसून येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अमृता पवार यांनी जिल्हा परिषदेमध्ये (Zilla Parishad) लोकप्रतिनिधित्व केले आहे. वसंत पवार आणि त्यांच्या मातोश्री नीलिमा पवार यांच्या नावाचे वलय त्यांच्यासोबत आहे, अमृता पवार यांचा एक स्वतंत्र समर्थक वर्ग आहे, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा नाशिकसह जिल्ह्याभरात रंगली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...