Thursday, June 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : नवरात्रोत्सवात ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनास अपघात; एकाचा मृत्यू, ११...

दुर्दैवी : नवरात्रोत्सवात ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनास अपघात; एकाचा मृत्यू, ११ जण जखमी

वणी | वार्ताहर Vani

- Advertisement -

नवरात्रोत्सवासाठी सप्तशृंगी गडावर ज्योत आणण्यासाठी जाणारी पिकअप गणेशघाटात वळणावर पलटी झाल्याने एक भाविक ठार तर अकरा जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मालेगाव तालुक्यातील बिलकोट, झोडगे , शेजवाळ, गुगलवाड येथीलभाविक आपआपल्या गावातील नवरात्र उत्सवासाठी ज्योत घेण्यासाठी रविवार दि.२१ रोजी दुपारी ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान पिकअप मध्ये जात असतांना घाटातील वळणावर पिकअप पलटी झाली. यातील ११ जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.

यापैकी उमेश धर्मा सोनवणे ( वय १७ ) हा मयत झाला तर मोहन भाईदास मोरे, रवींद्र नाना सोनवणे, प्रवीण हिरामण सोनवणे, दादाभाऊ गोरख कुवर, अशोक नाना सोनवणे, साईनाथ सुखदेव सोनवणे, बबलू गुणाजी सोनवणे, बादल संजीव सोनवणे, किरण एकनाथ सोनवणे, सुनील श्रावण सोनवणे (सर्व रा. भिलकोट, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात डॉ शुभम सातवे यांनी प्रथमोपचार केले. यातील काही जखमींना नांदुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे बिलकोट व परीसरातील गावावर शोककळा पसरली असून भाविकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...