Thursday, May 15, 2025
Homeधुळेलळींग घाटात अ‍ॅसिडचा टँकर उलटला

लळींग घाटात अ‍ॅसिडचा टँकर उलटला

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

- Advertisement -

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लळींग घाटात आज दुपारी पुणे येथून अ‍ॅसीड घेऊन इंदूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा टँकर अचानक ब्रेक फेल झाल्याने उलटला. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधील दोघे जखमी झाले आहेत. तर टँकरच्या मागे धावणार्‍या दुचाकीवरील दोघांना देखील दुखापत झाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर महामार्गावरील एकेरी वाहतूक थांबविण्यात आली होती.

पुणे येथून अ‍ॅसीड घेऊन एमएच 12 ईक्यू 5039 क्रमांकाचा टँकर इंदूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. आज दुपारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे नजीक असलेल्या लळींग गावाजवळ ट्रँकरचे अचानक ब्रेक फेल झाले. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला आणि काही अंतरापर्यंत घसरत गेला. त्यातील अ‍ॅसीड देखील रस्त्यावर विखुरले गेले.

टँकरमधील हसनोद्दीन शेख आणि संदेश मगर हे जखमी झाले. दोघांच्या डोळ्यात अ‍ॅसीड उडल्याचे समजते. याच दरम्यान टँकरच्या मागे येणारी दुचाकी देखील टँकरमध्ये घुसली. त्यात त्यामुळे दुचाकीवरील दोघे जखमी झाले. चौघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेचे माहिती मिळताच मोहाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने टँकरला रस्त्याच्या बाजुला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...