Monday, May 27, 2024
Homeनाशिकबुलेट - कारच्या धडकेत बोरगाव येथील कलाशिक्षकाचा मृत्यू

बुलेट – कारच्या धडकेत बोरगाव येथील कलाशिक्षकाचा मृत्यू

मनोज वैद्य | दहिवड | प्रतिनिधी

सोमवार (दि.१६) ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास मालेगावहुन कळवणच्या दिशेने जात असलेल्या बोरगाव येथील बुलेटवरील शिक्षकास इको कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात बुलेट स्वाराच्या छातीस व तोंडाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

सदर घटनेबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथील पोलीस पाटील संदीप दिगंबर खैरनार यांनी देवळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १६ ऑक्टोबरला संध्याकाळी चिंचावड-निंबोळा रस्त्यावर शिव नाल्याजवळ निंबोळा शिवारात मालेगावहुन कळवणच्या दिशेने जाणाऱ्या बुलेट क्रमांक एमएच १५ एचके ७४५६ ला मागून येणाऱ्या इको कार क्रमांक एमएच ०५ डीएच ३०६६ ने जोरदार धडक दिली व तेथून सदर कारचालक फरार झाला.

अपघातस्थळी चिंचावडचे पोलीस पाटील संदीप खैरनार हे गेले असता अपघातातील जखमी राजेंद्र तोताराम सूर्यवंशी मूळ राहणार नवलाने तालुका जिल्हा धुळे व सध्या डीपी विद्यालय बोरगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची ओळख पटली. त्यांनी तात्काळ सदर अपघातातील जखमी व्यक्तीस देवळा ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, या अपघाताबाबत देवळा पोलिसांत वाहन क्रमांक एमएच ०५ डीएच ३०६६ वरील अज्ञात चालका विरोधात भांदवी ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत. अपघातातील मृत झालेली व्यक्ती ही सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते ते आपल्या धुळे जिल्ह्यातील मुळगाव नवलाने येथून आपल्या कळवण येथे जात असल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या