Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्यामहापालिका रुग्णालयांतील अग्निशमन यंत्रणांचे होणार ऑडिट

महापालिका रुग्णालयांतील अग्निशमन यंत्रणांचे होणार ऑडिट

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेल्या विविध रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट राहिले आहे किंवा काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या लवकर पूर्ण करून अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आणि फायर ऑडिट प्रक्रिया ९० दिवसांत करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. तसेच रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनी विधानसभेत मुंबईतील सरकारी रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. मुंबईतील सर जे. जे., केईएम, शीव, नायर रुग्णालयासह उपनगरी रुग्णालयांमध्ये पुरेशी अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध नसून काही ठिकाणी ती कालबाह्य झाली आहेत. ती रुग्णालये कोणती आहेत आणि अग्नीसुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांविरुध्द काय कारवाई केली? असा प्रश्न राऊत यांनी विचारला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, सभागृहात उल्लेख केलेल्या रुग्णालयांचे फायर ऑडिट झालेले आहे. शीव रुग्णालयात १ कोटी, केईएममध्ये २ कोटी ७५ लाख, नायर रुग्णालयात ५० लाख रुपये, कूपर रुग्णालयात ४० लाख तर १६ उपनगरीय रुग्णालयांचे फायर ऑडिटसाठी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

अग्नीशमन यंत्रणेत राहिलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी निधीची आवश्यकता असून ते प्रस्ताव सरकारकडे आलेले असून या प्रस्तावांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल. सर जे. जे. रुग्णालयासाठी ५६ कोटी रुपये दिले जातील असेही त्यांनी सांगितले. अमित देशमुख, सुनील प्रभू, अमिन पटेल, आशिष शेलार, राम कदम, राजेश टोपे, अजय चौधरी, रवी राणा आदींनी यावेळी उपप्रश्न विचारले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या