Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजन"पप्पा तुम्ही मला आठवणीमध्ये ठेवा"...सतीश कौशकच्या मुलीचं भावनिक पत्र

“पप्पा तुम्ही मला आठवणीमध्ये ठेवा”…सतीश कौशकच्या मुलीचं भावनिक पत्र

मुंबई| Mumbai

बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक (Film director) आणि अभिनेते सतीश कौशिक(Satish Kaushik) यांचं ९ मार्च २०२३ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सतिश यांच्या निधनानंतर कलाक्षेत्राला मोठा धक्का बसला. शिवाय त्यांचं संपूर्ण कुटुंबही कोलमडून गेलं. १३ एप्रिलला सतिश यांचा ६७वा वाढदिवस होता. यावेळी अनुपम खेर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

- Advertisement -

या अभिनेत्रीला कलाक्षेत्रासोबतच आहे राजकारणाची आवडपुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा

नुकताच सतीश कौशिक यांचा भाचा निशांत याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये निशांत हा सतीश कौशिक यांच्या जाण्याने घरातील सदस्यांची हाल कसे आहेत हे सांगताना दिसतोय. विशेष: सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका हिचे. निशांत म्हणाला की, वडील सतीश कौशिक यांच्या निधनानंतर वंशिका(Vanshika) पुर्णपणे तुटली आहे. ती सतत रडते वडिलांच्या आठवणीमध्ये. इतकेच नाहीतर काल रात्रीही ती खूप जास्त रडलीये. सतीश कौशिक आणि वंशिका यांच्यामध्ये वडील आणि मुलीपेक्षाही एक सुंदर मैत्रीचे नाते होते. कायमच सतीश कौशिक हे बाहेर कुठे गेले की, ती सतत त्यांची वाट पाहत जागत असत.

महाराष्ट्रात ४८ पैकी ४० जागा जिंकू, २०२४ ला सत्तापरिवर्तन होणार – संजय राऊत

वंशिकाने म्हटलं, “तुमच्या बऱ्याच मित्रांनी मला खचून जाऊ नकोस असं सांगितलं. पण मी तुमच्याशिवाय राहूच शकत नाही. मला तुमची खूप आठवण येते. असं काही घडणार आहे हे मला आधीच माहिती असतं तर मी शाळेमध्येच गेली नसती. तुमच्याबरोबरच एकत्रित वेळ घालवला असता, तुम्हाला एकदा मिठी मारता आली असती. पण तुम्ही तोपर्यंत निघून गेला होतात. माझा अभ्यास पूर्ण झाला नाही की, आई ओरडते. पण आता मला तिच्या ओरडण्यापासून कोण वाचवणार?. मला आता शाळेमध्ये जाण्याचीही इच्छा होत नाही. माझे मित्र-मैत्रिणी मला काय म्हणतील? कृपया माझ्या नेहमी माझ्या स्वप्नामध्ये या”.“तुमच्यासाठी आम्ही पूजा ठेवली आहे. पण तुम्ही पुर्नजन्म घेऊ नका. ९०व्या वर्षी आपण दोघं पुन्हा भेटू. पप्पा तुम्ही मला आठवणीमध्ये ठेवा आणि माझ्याही आठवणींमध्ये तुम्ही कायम राहणार. माझ्या हृदयामध्ये तुमच्यासाठी नेहमीच एक वेगळं स्थान राहील. मला कधीही मार्गदर्शनाची गरज असेल तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर कायम असणार. माझ्याजवळ जगातील सगळ्यात बेस्ट वडील होते”. वंशिकाने वडिलांना लिहिलेलं हे पत्र खरंच डोळ्यात पाणी आणणारं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या