Sunday, September 22, 2024
Homeमुख्य बातम्यादै.'देशदूत'आयोजित 'नाशिकरोड प्रॉपर्टी एक्सपो'ची उत्साही सांगता

दै.’देशदूत’आयोजित ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्सपो’ची उत्साही सांगता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकरोड ( Nashikroad )व परिसरातील नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दै. ‘देशदूत’ आयोजित व दीपक बिल्डर्स प्रायोजित ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्सपो’चा शानदार समारोप करण्यात आला.

प्रदर्शनाच्या तीनही दिवस नाशिकरोडवासीयांनी विविध बांधकाम व्यावसायिकांच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या स्वगृहस्वप्नपूर्तीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली. एक्सपोचे इव्हेंट पार्टनर स्पायडर मीडिया हाऊस हे होते.

तीन दिवसांत लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवंतांना सोनी गिफ्ट्सकडून भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी दै. ‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले उपस्थित होत्या. जे ग्राहक उपस्थित नव्हते त्यांनी येत्या 7 दिवसाच्या आत प्रतीक आर्केड, नाशिकरोड येथील दै. ‘देशदूत’च्या विभागीय कार्यालयात संपर्क साधून ओळखपत्र दाखवून आपले बक्षिसे घेऊन जाण्याचे आवाहन ‘देशदूत’तर्फे करण्यात येत आहे.

एक्सपो यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर आनंद कदम,भगवंत जाधव, समीर पाराशरे, रितेश जाधव, संजय लोळगे, दिगंबर शहाणे, विशाल जमधडे यांनी परिश्रम घेतले.

लकी ड्रॉचे विजेते : राजेश वाघमारे, एस. के. रोगरे, विनोद राजयोग, पी. आर मणियार, प्राची राऊत यांना सोनी गिफ़्टकडून बक्षिसे देण्यात आली.

मान्यवरांच्या भेटी : एक्सपोला माजी आमदार योगेश घोलप, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, माजी नगरसेवक शैलेश ढगे, मनपा अधिकारी उदय धोंगडे, नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, सायली अ‍ॅडचे राजेश शेळके, श्री पब्लिसिटीचे सचिन गिते या मान्यवरांनी भेट देत सहभागी बांधकाम व्यावसायिकांशी संवाद साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या