नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मणिपूरमध्ये (Manipur Violence) गेल्या मे महिन्यात दोन महिलांची विवस्र धिंड काढण्यात (Viral Video of two Womens) आली होती. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे पुर्ण देशात संतापाची लाट उसळली. या प्रकरणावरुन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गुरवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली होती. या घटनेचा सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी केंद्रातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ही सरकारवर या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरत या घटनेचा तीव्र विरोध दर्शवला. दरम्यान, आता सीबीआय मार्फत चौकशी करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने या तपासाला वेग मिळणार आहे.
मणिपूर घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठे यश मिळाले आहे. त्यांच्याकडून तो मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ज्याचा उपयोग दोन महिलांच्या नग्न अवस्थेत धिंड काढल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी केला जात होता. हे प्रकरण सीबीआयकडे असून सीबीआयने गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार मणिपूर पोलिसांकडून तपास हाती घेत नवीन एफआयआर नोंदवला आहे. या एफआयआरमध्ये कलम १५३ए, ३९८, ४२७, ४३६, ४४८, ३०२, ३५४ आणि ३६४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.