Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याघंटागाडी संख्येत वाढ, पण ब्लॅक स्पॉट कायम

घंटागाडी संख्येत वाढ, पण ब्लॅक स्पॉट कायम

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेकडून (Nashik Municipal Corporation) स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात येत आहे तर नुकताच एक डिसेंबरपासून तब्बल सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा ठेका (contract) नव्याने देण्यात आला आहे.

- Advertisement -

नव्या ठेक्यात वाहनांची संख्या वाढली असून गल्लीबोळात जाण्यासाठी छोटी वाहने देखील स्वतंत्रपणे कामावर लावण्यात आली आहे. असे असले तरी शहरातील अनेक भागात अद्यापी ब्लॅक स्पॉट (Black spot) दिसून येत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने (Municipal administration) विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

पावणे दोनशे कोटी वरून साडेतीनशे कोटींवर गेलेल्या घंटागाडीच (garbage van) ठेका यंदा चांगलाच गाजत आहे. अगोदरच ज्या ठेकेदाराने स्वच्छतेचे काम घेतले आहे तसेच अनेक वेळा वादग्रस्त ठरलेल्या त्या ठेकेदाराला शहरातील सहापैकी दोन विभाग घंटागाडी साठी देखील देण्यात आले आहे तर दुसरीकडे नव्या घंटागाडीच्या उंचीवरून (garbage van) देखील नवा वाद निर्माण झाला आहे.

कोट्यावधी खर्चून नाशिककरांच्या (nashikkar) माथी मारलेल्या आउटसोर्सिग (Outsourcing) ठेक्याच्या माध्यमातून सातशे कर्मचारी (employyes) व घंटागाडी देखील आहे. असे असूनही शहरातील अस्वच्छतेचे ब्लॅक स्पॉट हटविण्यात पालिकेच्या स्वच्छता विभागाला (Sanitation Department) अपयश आल्याचे चित्र आहे. घंटागाडीकरिता दीडशे कोटींना देण्यात आला आता हाच ठेका 354 कोटी रुपये पर्यत गेला आहे.

पूर्वीपासून नाशिक शहरातील विविध भागात अस्वच्छ्तेचे ब्लॅक स्पॉट होते ते आजही जसेच्या तसेच आहे. पालिका कोट्यवधींचा खर्च करते तो पैसा जातो कुठे असा संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या