Saturday, April 26, 2025
Homeधुळेसराईत गुन्हेगाराचा व्यापार्‍यासह तरूणावर प्राणघातक हल्ला

सराईत गुन्हेगाराचा व्यापार्‍यासह तरूणावर प्राणघातक हल्ला

दोंडाईचा ।dondaicha । श.प्र.

शहरात जबरी गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार (Innocence criminal) विक्की निकवाडे याने मागील कुरापती काढून शहरातील एका व्यापार्‍यासह (merchant)तरुणावर (youth) प्राणघातक हल्ला (Assault) केला. यात व्यापारी गंभीररित्या जखमी झाला आहे. दोंडाईचा पोलिसांनी विक्की निकवाडेच्या मुसक्या आवळल्या.

- Advertisement -

जवळ बाळगला देशी कट्टा एलसीबीने ठोकल्या बेड्या Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा…

शहरातील रॉयल टाईल्सचे संचालक मुस्ताफ एहसानभाई रामीवाला (वय 42 वर्ष) हे दुकानात बसलेले असतांना तिथे विक्की निकवाडहा तिथे आला. त्याने मागील भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच तो दुकानातील वस्तूंची तोडफोड करु लागला. विक्कीला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्याकडील कोयत्याने मुस्ताफभाई यांच्या डोक्यावर वार केला. भयभयीत झालेल्या व्यापार्‍याने आपला जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढला. या गंभीर हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर जबर जखम झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, विक्की निकवाडेने व्यापार्‍यासह शहरातील पिंपळ चौकातील रहिवासी असलेल्या हमालावरही जीवघेणा हल्ला केला. अक्षय देविदास शिंपी असे जखमी तरुणाचे नाव आहे. भाजी मंडई परिसरात हमालीचे पैसे गोळा करत असतांना विक्की निकवाडे साथीदारासह तिथे आला. त्याने त्याच्याशीही मागील वाद उकरुन काढला.

यावेळी विक्कीने त्याच्याकडील कोयत्याने अक्षयवर वार केला. यात अक्षयच्या हातावर आणि डोक्यावर गंभीर इजा झाली. अक्षयला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. विक्की निकवाडे याच्यावर दोंडाईचा पोलीस ठाण्यात भादवी 307,427, भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 प्रमाणे व भादंवि 326,504,506,34 आर्म ऑक्ट कलम 4/25 प्रमाणे असे दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील उपनिरीक्षक सचिन गायकवाड व पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत पाटील हे करीत आहेत.

Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या