Wednesday, April 2, 2025
Homeधुळेधुळे : अज्ञात वाहनाची मोटर सायकलला धडक

धुळे : अज्ञात वाहनाची मोटर सायकलला धडक

धुळे/कुरखळी – वार्ताहर Dhule

मुंबई-आग्रा महामार्गावर आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धुळ्याहुन शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या मध्यप्रदेशातील मोटरसायकल स्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात एक जण गंभीर जखमी तर इतर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

एमपी ४६ एम क्यू ३१७९ या क्रमांकाची मोटरसायकल धुळ्याहून शिरपूरच्या दिशेने जात असतांना दभाषी (ता. शिंदखेडा) गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत निलंज्या राहिल्या पावरा (२९), हे गंभीर जखमी झाले असून नान्या राहिल्या पावरा (१०), व गणेश राहिल्या पावरा (६) हे किरकोळ जखमी आहेत. त्याच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला धुळे येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मोहीम

0
ओझे l विलास ढाकणे oze मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यभार स्वीकारल्यापासून दूध भेसळ रोखण्यासाठी कंबर कसली असून मागील तीन महिन्यात अचानकपणे...