Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; पत्नीचा मृत्यू; पती गंभीर जखमी

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; पत्नीचा मृत्यू; पती गंभीर जखमी

घोटी | जाकीर शेख Ghoti

- Advertisement -

मुंबई- नाशिक महामार्गावर माणिखांब जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती गंभीर जखमी झाला तर पत्नी जागेवरच मयत झाली.

या बाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घोटीहुन सोपान किसन राव, वय २६ व त्यांची पत्नी वनिता सोपान राव, वय २३ रा. मुकणे, ता इगतपुरी हे मोटार सायकलवरून नाशिकच्या दिशेने जात असतांना माणिक खांब जवळ एका अज्ञात वाहनाने मागुन धडक दिली असता सोपान किसन राव गंभीर जखमी झाले तर वनिता सोपान राव ह्या जागेवरच मयत झाल्या.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मयत महिला यांना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

गोंदे फाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका सेवेने तातडीने रुग्णांना दाखल केल्याने जखमी किसन राव यांचा जीव वाचला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या