Wednesday, April 2, 2025
Homeनंदुरबारकोळदे येथे अज्ञात महिलेचा धारदार शस्त्राने खून

कोळदे येथे अज्ञात महिलेचा धारदार शस्त्राने खून

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

तालुक्यातील कोळदा येथे 30 वर्षीय अज्ञात महिलेचा (unknown woman) धारदार कटरच्या (sharp weapon) साहयाने खून (killed) झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजेपुर्वी कोळदा (ता.नंदुरबार) शिवारातील नरोत्तम मुरार पाटील यांच्या गट क्र 138 या बाजरीच्या शेतात एका अनोळखी 30 ते 35 वर्ष वयाच्या महिलेस कोणीतरी अज्ञात आरोपीताने अज्ञात कारणावरुन धारदार कटरचे सहाय्याने वार करुन जिवे ठार मारल्याची घटना घडली.

याबाबत ईश्वर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : आदिमायेच्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; गडावर प्लास्टिक बंदी

0
सप्तशृंगगड | नांदुरी | वार्ताहर | Nanduri आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगीमातेच्या चैत्रोत्सवास ५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने...