धुळे Dhule । प्रतिनिधी
आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) योजना फसली (plan failed) असून कुठे दाळ तर कुठे साखर (Dal did not get sugar) मिळाली नाही. तरीही शंभर रूपयांची वसुली (recovery of one hundred rupees) करण्यात आली. तरी ही वसूली थांबवत जास्तीचे घेतलेले पैसे ग्राहकांना परत (Money back to customers) करावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे (Congress) पालकमंत्री गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, युवराज करनकाळ, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, डॉ.भरत राजपूत, नरेंद्र पाटील, धनंजर कुवर, सचिन पवार, भूषण भदाणे आदी उपस्थित होते. सार्वजनिक वितरण प्रणाली योजना गेल्या तीन ते चार वर्षाच्या कालखंडात नियोेजना अभावी बदनाम होऊ पहात आहे. काही स्वार्थाध दुकानदार या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. तसेच आजही पॉज मशिन काम देत नाही. त्यामुळे दुकानदारांची गैरसोय होते.
तर ग्राहकांना वेळेवर धान्य न मिळाल्याने हाल होतात. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने रेशनकार्ड धारकांना शंभर रुपयात रवा, तेल, चना दाळ आणि साखर देण्याचा निर्णय घेतला. परंतू नियोजना अभावी ही योजना पुर्णतः फसली. दिवाळीत पॉज मशिनने दगा दिला. दिवाळीपर्यंत मालाचाच पुरवठा झाला नाही.
वेळेवर पुरवठा न होण्याचे मुख्य कारणही मनःस्ताप देणारे होते. ज्या पिशवीमधुन हे धान्य द्यायचे होते. त्यावर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणविस यांचे फोटो छापले गेले नव्हते. ते छापले गेल्यावर पिशव्या उपलब्ध झाल्या. त्यात दिवाळी उजाडली. प्रत्यक्षात रेशन दुकानावर साखर न देताच ग्राहकांकडून रुपये घेण्यात आले.
काही ठिकाणी दाळ तर अनेक ठिकाणी साखर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यात खटके उडून दिवाळी कडू झाली. प्रत्यक्षात साखर न देताच शंभर रुपये घेण्यात आले. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. साखर व तेल जिल्ह्यातच उपलब्ध नसल्यामुळे पैशांची वसुली थांबवावी. ज्या नागरिकांना अपुर्ण वस्तु मिळाल्या त्यांना त्यांचे पैसे परत करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केली खंत
काँग्रेसच्या मागणीवर पालकमंत्री महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या योजनेबद्दल खंतही व्यक्त केली. योजनेबाबत घाई झाल्यामुळेच अडचणी निर्माण झाल्या. परंतु शासन निश्चितच सर्व वस्तू जनतेपर्यंत पोहोचवेल, असे त्यांनी सांगितले.