Thursday, March 27, 2025
Homeमुख्य बातम्याअनंत कान्हेरे आणि जॅक्सन वध

अनंत कान्हेरे आणि जॅक्सन वध

नाशिक | वैभव कातकाडे Nashik

21 डिसेंबर 1909; स्थळ : नाशिकमधील विजयानंद नाट्यगृह(Vijayanand Theatre); ऐतिहासिक घटनेला आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या (freedom struggle) पायाभरणीला सुरुवात झाली. याआधी 52 वर्षांपूर्वी 1857 मध्ये कंपनीवाल्यांना पिटाळून लावण्यासाठी मोठे बंड देशभरात झाले होते.

- Advertisement -

त्याचाच परिपाठ पुस्तकरूपाने पुनराज्जीवित करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 चे स्वातंत्र्य समर लिहिले आणि देशातील युवकांना प्रेरित केले होते. त्या दिवशी विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळीचा शारदा नाटकाचा प्रयोग सुरू असताना अनंत कान्हेरे (Anant Kanhere)या तरुणाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन (Collector Jackson) याचा वध केला.

नाशिक शहरात त्र्यंबकरोड परिसरात सकाळी आठनंतर गुरे चारायला घेऊन जाण्यास बंदी होती. अशावेळी एक शेतकरी त्र्यंबकरोडवर गुरे घेऊन गेला असताना त्या शेतकर्‍याला विल्यम नावाच्या इंजिनिअरने मारहाण केली. त्यात शेतकर्‍याचा मृत्यू झाला. त्याचा खटला बाबासाहेब खरे यांनी चालवल्याने त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यानंतर 1906 मध्ये सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीत वंदे मातरम् म्हणू नका, असे आदेश देण्यात आले होते.

त्यावेळी वंदे मातरम् म्हणणार्‍या अकरा जणांवर खटले दाखल करण्यात आले होते. बाबारावांनाही शिक्षा झाली होती. या सगळ्यांची परतफेड करावी या विचारातून कृष्णाजी कर्वे यांनी ही योजना आकारास आणली होती. त्याकाळात संपूर्ण नाशिक शहरात वंदे मातरम् म्हणण्यावर बंदी होती. जो वंदे मातरम् म्हणेल त्याच्यावर खटला दाखल केला जात होता. त्याचप्रमाणे ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा…’ ही कविता बाबाराव सावरकर यांनी छापून प्रसिद्ध केली होती म्हणून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब खरे यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या तीनही गोष्टींचा राग कृष्णाजी कर्वे यांच्या मनात होता. या रागातून त्यावेळचा कलेक्टर जॅक्सनचा वध करावा, अशी कल्पना पुढे आली. 1909 च्या सुमारास इंग्लंडमधील चतुर्भुज या इंडिया हाऊसमधील आचार्‍याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 20 पिस्तुले भारतात पाठवली होती. त्यापैकी एक पिस्तूल कृष्णाजी कर्वे यांनी मिळवले होते.

या घटनेत सहभागी असणार्‍या अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे या तीन तरुणांना पुढे 10 एप्रिल 1910 रोजी फाशी देण्यात आली. ते वापरण्याचा सराव म्हसरूळ परिसरात केला जात असे. म्हसरूळ भाग त्यावेळी निर्जन होता. त्या भागात चिटपाखरूदेखील फिरकत नसे. शक्यतो हा सराव रात्रीच्या वेळी केला जात असे. ही बाब नाशिकमधील निवडक व्यक्तींना माहिती होती. नाटकाच्या दिवशी रात्री तिघेही नियोजनानुसार विजयानंदमध्ये पोहोचले.

कान्हेरे हे दरवाजाजवळ थांबले. कर्वे व देशपांडे प्रेक्षकांच्या गर्दीत जॅक्सनच्या जवळ जागा मिळवणार होते. नाटक सुरू होऊन पहिला अंक संपत आला तरी जॅक्सन आला नव्हता. तिघांची चलबिचल सुरू झाली. मात्र, नाटकाचा दुसरा प्रवेश सुरू होता होताच जॅक्सनची गाडी नाट्यगृहाबाहेर आली. गाडीतून उतरून आपल्या सहकारी अधिकार्‍यांबरोबर सहकुटुंब जॅक्सन नाट्यगृहाकडे चालू लागला.

ओट्याकडून पायर्‍यांकडे जात असतानाच अनंत कान्हेरेंनी आपल्या पिस्तुलातून लागोपाठ पाच गोळ्या जॅक्सनवर झाडल्या. जॅक्सनच्या स्वागतासाठी फटाके फुटत असल्याचा भास सर्वांमध्ये निर्माण झाला. मात्र, जमिनीवर कोसळणार्‍या जॅक्सनकडे पाहिल्यानंतर नेमकी घटना सर्वांच्या लक्षात आली. कान्हेरे न घाबरता तेथे थांबून राहिले. जॅक्सनच्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकार्‍यांनी कान्हेरे यांना ताब्यात घेतले. त्या गडबडीत देशपांडे, कर्वे सुखरूप नाट्यगृहाबाहेर पडले. पोलीस चौकशीत सर्व कट उघडकीस आला आणि पोलीस कर्वे, देशपांडे यांच्यापर्यंत पोहोचले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ मार्च २०२५ – उभारी देणारा उपक्रम

0
कोणत्याही सरकारी व्यवस्थांवर-सेवांवर सामान्यतः टीकाच केली जाते. विशेषतः सार्वजनिक आरोग्यसेवेचा उल्लेख केला तरी असंख्य तक्रारींचा पाऊस पडल्याचे अनेकदा आढळते. तथापि ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा एक...