Monday, November 25, 2024
Homeधुळेआणि म्हणून मुंजवाड गावात लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना घातली बंदी

आणि म्हणून मुंजवाड गावात लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना घातली बंदी

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

सद्यःस्थितीला शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच इतर शेतीमालाला (agricultural produce) ही भाव (No price.) नाही. यामुळे मुंजवाड गावात 21 मे पासून कुठल्याही आमदार, खासदार, मंत्री, (MLAs, MPs, Ministers,) विविध राजकीय पक्षांचे (various political parties) पदाधिकारी (Office bearer) यांना मुजवाड गावात (village) प्रवेश बंदी (Entry ban) करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रवेश केला तर त्यांच्यावर कांदा फेकून निषेध केला जाईल असा ठराव शेतकरी क्रांती मोर्चा मुंजवाड व कांदा उत्पादक शेतकरी यांनी केला आहे.

आज गावाच्या चारही बाजूने राजकीय पुढार्‍यांना प्रवेश बंदचे फलक लावण्यात आले. सद्यःस्थितीला शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच इतर शेतीमालाला ही भाव नाही. भारताची अर्थव्यवस्था शेतकर्‍यांच्या हातात असून शेतकर्‍यांची आज स्थीती वाईट झालेली आहे.

अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गावकर्‍यांनी राजकीय पुढार्‍यांना बंदी केल्यास निष्क्रिय राजकीय पुढारी, प्रतिनिधी यांनी शासनाला जाब विचारला पाहिजे. असे मत शेतकरी क्रांती मोर्चा मुंजवाड चे प्रतिनिधी केशव सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. यावेळी मुंजवाड गावातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या