धुळे Dhule । प्रतिनिधी
शहरातील प्रमुख रहदारीचा पोलिस मुख्यालय ते फाशीपूल (Police Headquarters to Fashipool) पर्यंतचा रस्ता पूर्ण खराब (road is completely damaged) झाला असून सदर रस्त्यावर मोठे खड्डे (Big pits) पडलेले आहेत. हे खड्डे लोकांच्या जीवावर (people’s lives) उठले असून वारंवार मागणी करून देखील धुळे महापालिका (Municipality) रस्ता दुरुस्त करत (Repair the road) नसल्याने आज उपमहापौर तथा भाजपाच्या नगरसेविका (Deputy Mayor and BJP corporator) कल्याणी अंपळकर यांनी आज नागरिकांसह (including citizens)मनपा विरोधात आंदोलन (Agitation against Municipal Corporation) केले. मनपावर भाजपाची सत्ता (BJP rule) असूनही त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविकेने केलेले आंदोलन म्हणजे भाजपाला घरचा आहेर (BJP is jealous of the house) आहे काय? अशीही यानिमित्ताने चर्चा आहे.
कल्याणी अंपळकर व नागरिकांनी आज या रस्त्यावर खड्यात उतरून आंदोलन केले. लोकांचा जीव गेल्यावर रस्ता दुरुस्त करणार का? असा जाहीर सवालही आंदोलकांनी उपस्थित केला. मध्यवर्ती एसटी बसस्थानकाजवळ पोलीस मुख्यालयाच्या समोर असलेला प्रमुख रस्ता गेल्या अनेक वषारपासून मनपाच्या दुर्लक्षामुळे खड्डे आणि त्यात गटारीचे पाणी साचून जीवघेणा बनला आहे.
या रस्त्यावर गुढघ्याएवढे खड्डे पडल्याने वाहनच काय, पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होत असून जीवतीहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसेच हा रस्ता बसस्थानकाजवळ असून मुख्य रहदारीचा असल्याने तो त्वरीत दुरुस्त होणे आवश्यक आहे. मात्र, थातूरमातूर काम करून मनपा प्रशासन वेळ मारून नेत आहे. आता तर रस्त्यांवरून एसटी बस, रिक्षा आणि कोणतेही वाहन जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कल्याणी अंपळकर यांच्या सोबत सतीश अंपळकर, भाजपाचे महानगर उपाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, सुहास अंपळकर, वसंत शिंदे, आबा पगारे, मधु जाधव, कल्याण महाजन, पप्पू अजबे, बापू चौधरी, भूषण मोरे, सतिष सपकाळ, सचिन खैरनार, सचिन देवरे, आशाबाई शेवतकर, सुमन चौगुले, श्रीमती कोळवले, सुमनबाई चौगुले, वालाबाई लोहार आदी उपस्थित होते.