Sunday, November 24, 2024
Homeधुळेअन् धुळ्यात निघाली मनपाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

अन् धुळ्यात निघाली मनपाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

धुळे dhule । प्रतिनिधी

शहरात दहा ते पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. परंतू याकडे महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त उबाठा शिवसेनेतर्फे मनपा आणि पाणीपुरवठा विभागाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पाणी टंचाईवर लक्ष वेधले. आंदोलनाचे वैशिष्ट्ये म्हणजे तिरडीवर पाण्याच्या प्रतिक्षेत असलेली भांडी ठेवण्यात आली होती. तसेच महिलांच खांदेकरी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी मनपाचा निषेध केला.

- Advertisement -

शहरातील सर्वच भागात आठ-दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे तिरडीवर पालथा हंडा आणि पातेलं ठेवले होते. चारही खांदेकरी देखील महिलाच होत्या. शिवसेनेच्या नेत्या हेमाताई हेमाडे अग्रभागी होत्या. त्यांनी अग्नीडागसाठी मडक्याऐवजी रिकामी कळशी हातात घेतली होती.

दररोज पाणी देण्याचे आश्वासन देणार्‍या पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच आयुक्त, महापौर यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.15-15 दिवस पाणी न देणार्‍या भाजप सत्ताधार्‍यांविरोधातील महिलांच्या आक्रोशामुळे शहर दणाणून गेले होते.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाजत गाजत निघालेली ही अंत्ययात्रा झाशी राणी पुतळा चौक, जुनी महापालिका, महाराणा प्रताप चौक, फुलवाला चौकापासून पुढे सरळ आग्रा रोडने अंत्ययात्रा बॉम्ब लॉज चौकातून वळून नव्या महापालिकेवर धडकली. तिथे तिरडी खाली ठेवण्यात आली. यानंतर हेमाताई हेमाडेंनी तिरडीला पाच फेर्‍या मारल्या. तेव्हा सार्‍यांनी महापालिकेच्या नावाने बोंब ठोकली.

आंदोलनात सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमाताई हेमाडे, डॉ.जयश्री महाजन, अरूणा मोरे, देविदास लोणारी, ललित माळी, भरत मोरे, गुलाब माळी, नरेंद्र परदेशी, मच्छिंद्र निकम, संदीप सुर्यवंशी, आण्णा फुलपगारे, विनोद जगताप, नंदलाल फुलपगारे, संजय जवराज, संदीप चौधरी, प्रवीण साळवे, प्रकाश शिंदे, महादू गवळी, कैलास मराठे, आनंद जावडेकर, लखन चांगरे, पिनूसूर्यवंशी, पंकज भारस्कर, मुन्नाभाई पठाण, शरद गोसावी, आबा भडागे, संजय जगताप, हेमंत बागुल, दिनेश पाटील, सागर निकम, अजय चौधरी, शुभम मतकर, अमोल ठाकूर, निलेश वाघमोडे, कपील लिंगायत, शत्रुघ्न तावडे, नितीन जडे, दीपक मोरे, प्यारेलाल मोरे, शुभम रणधीर, निलेश चौधरी, निलेश कांजरेकर, प्रतिभा सोनवणे, कुदांताई मराठे, सीमा मराठे, शंकुतला खैरनार, संतोष शर्मा, संगीता भागवत, सुरेश चौधरी, किशोर पालेकर, मुकेश भोकरे, लक्ष्मी आदित्य बगन आदी शिवसैनिक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या