Tuesday, March 25, 2025
Homeनगरअंगणवाड्यांमध्ये पाळणाघरे; पाळणा सेविका व मदतनीसांना मानधन मिळणार

अंगणवाड्यांमध्ये पाळणाघरे; पाळणा सेविका व मदतनीसांना मानधन मिळणार

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भत्ता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्तीमधील ‘सामर्थ्य’ या कार्यक्रमांतर्गत राज्यात अंगणवाड्यांमध्ये पाळणा ही योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली असून त्याबाबतचे सरकारने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, संबंधित अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भत्ता तसेच पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांना मानधन देण्यात येणार आहे. सुरुवातीला 345 पाळणा घरे सुरू करण्यात येणार आहेत. केंद्राकडून येणार्‍या मागणीनुसार त्याची पुढे अंमलबजावणी होणार आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक पाळण्याकरिता पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांचे प्रत्येकी 1 पद निर्माण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी वार्षिक खर्च 3 लाख 35 हजार एवढा आहे. या खर्चास 60 टक्के केंद्र तर राज्याचा हिस्सा 40 टक्के राहील.

- Advertisement -

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार पाळणाघरांसाठी आवश्यक साहित्य, पूर्वशालेय शिक्षण घटक संच, अतिरिक्त पूरक पोषण आहार, पाळणा भाडे, औषधी संच, खेळाचे साहित्य, संबंधित अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भत्ता तसेच पाळणा सेविका व पाळणा मदतनीस यांचे मानधन करीता मासिक तसेच वार्षिक खर्च अनुज्ञेय करण्यात आला आहे. पाळणा उभारणीसाठी खर्च एकवेळ 50 हजार रूपये इत्तका राहिल.

राज्यतरीय, जिल्हा समिती
या योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती, आयुक्त स्तरावरही गठीत करण्यात आली आहे. जिल्हा समितीही स्थापित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील. झेडपीचे महिला व बाल कल्याण विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, तसेच जिल्हयातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी सदस्य असतील तर सेवाज्येष्ठ बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सदस्य सचिव असतील.

पाळणा स्तरावर समिती
अंगणवाडी सेविका-अध्यक्ष, अंगणवाडी मदतनीस, 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांची माता, 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांची माता, पाळणा मदतनीस हे सदस्या असतील तर पाळणा सेविका सदस्य सचिव राहतील.

असा मिळणार भत्ता..मानधन
पाळणा मधील अंगणवाडी सेविकांना मासिक भत्ता 1500 रुपये, पाळणा मधील अंगणवाडी मदतनीसांना मासिक भत्ता 750 रुपये, पाळणा सेविकांना मासिक मानधन 5500 रूपये, पाळणा सेविकांना मासिक मानधन 3000 रुपये, अतिरिक्त पूरक पोषण आहार (25 लाभार्थी) 4375 रुपये, पूर्व शालेय शिक्षण घटक संच 625 रुपये, इतर खर्च 1300, पाळणा भाडे महानगर क्षेत्र-12000 रुपये, महानगर क्षेत्र वगळता 8000 रुपये, पाळणातील साहित्य/खेळाचे साहित्य 10000 रूपये, औषधी संच 1000 रुपये असा खर्च अनुज्ञेय आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...