Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedआ.संजय शिरसाट यांच्यावर अँजिओप्लास्टी

आ.संजय शिरसाट यांच्यावर अँजिओप्लास्टी

औरंगाबाद – aurangabad

शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी सकाळी एअर अँब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले. लीलावती रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिनीत ब्लॉकेज असल्याचे समोर आले. त्यांची अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकून रक्‍तवाहिनीतील अडथळा दूर करण्यात आला. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

- Advertisement -

पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत आ. शिरसाट उपस्थित होते. घरी गेल्यानंतर त्यांना अचानकपणे अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी ४ वाजता सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा रक्‍तदाब कमी होत नव्हता. त्यामुळे शिरसाट यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी एअर अँब्युलन्स पाठविली. शिरसाट यांना एअर अँब्युलन्समधून मुंबईला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गोखले आणि अन्य तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने त्यांची अँजिओग्राफी केली. त्यांची एक रक्तवाहिनी ब्लॉक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर लगेच अँजिओप्लास्टी करण्यात आली. स्टेंट टाकून रक्‍तवाहिनीतील अडथळा दूर केल्याची माहिती देण्यात आली. आमदार शिरसाट यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा सिद्धांत शिरसाट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी रुग्णालयात आहेत. आमदार शिरसाट यांची प्रकृती खालावल्याचे कळताच मुख्यमंत्र्याती सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांना दोन वेळा फोन करून माहिती घेतली.

ग्रीन कॉरिडॉर
दरम्यान, आमदार शिरसाट यांना एअर अँब्युलन्सने मुंबईला हलवण्याचे निश्चित झाल्यावर स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलीस आयुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक विभागावे सिग्मा हॉत्पिटल ते औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमाततळ यादरम्यात सकाळी ८ वाजता ग्रीन कॉरिडॉर केला. अवघ्या पाच ते सात मिनिटांत शिरसाट यांना रुग्णालयातून विमानतळावर नेण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या