Monday, May 27, 2024
Homeदेश विदेशअनिल अंबानी कंगाल?

अनिल अंबानी कंगाल?

नवी दिल्ली –

एकेकाळी देशातील सर्वोच्च उद्योगपती असलेले अनिल अंबानी यांनी स्वत:च कंगाल झाल्याचे संकेत दिल्याने उद्योग

- Advertisement -

जगतात आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्याला वकिलांची फी भरण्यासाठी दागदागिने विकावे लागत असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.

उद्योगपती अनिल अंबानी कर्जाच्या ओझ्याखाली असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर इंग्लडच्या एका न्यायालयात दावा दाखल आहे. यावर्षी जानेवारी ते जून या दरम्यान त्यांनी 9 कोटी 9 लाख रुपयांचे दागिने विकले आणि आता त्यांच्याकडे विकण्यासारखं काही शिल्लक नाही. लक्झरी मोटारींच्या ताफ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, या सर्व अफवा माध्यमांतून येत आहेत. माझ्याकडे कधीही रोलस रॉयस नव्हती. सध्या मी फक्त एक कार वापरत आहे, असा दावा त्यांनी या न्यायालयासमोर केला आहे.

22 मे 2020 रोजी, इंग्लंडच्या उच्च न्यायालयाने चीनमधील तीन बँकांना अंबानी यांना 12 जून 2020 पर्यंत जवळपास 5 हजार 281 कोटी कर्जाची रक्कम आणि 7 हजार कोटी कायदेशीर खर्चाची फी म्हणून देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर 15 जूनला चीनच्या औद्योगिक आणि वाणिज्य बँक ऑफ चायनाच्या नेतृत्वात चिनी बँकांनी अनिल अंबानी यांची संपत्ती उघडकीस आणण्याची मागणी केली होती.

29 जून रोजी मास्टर डेव्हिसन यांनी अंबानी यांना प्रतिज्ञापत्राद्वारे जगभरात पसरलेल्या (अंदाजे 1 लाख डॉलर) किंमतीच्या मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश दिले. या मालमत्तेत आपला पूर्ण वाटा आहे की कोणत्याही मालकाचा संयुक्तपणे हक्क आहे, हे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्याचे आदेश होते.

या आदेशावरून कोर्टाला देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात अंबानी म्हणाले, त्यांनी रिलायन्स इनोव्हेचर्सला 5 अब्जचे लोन दिले आहे. ते म्हणाले की, रिलायन्स इनोव्हेचर्समधील 1.20 कोटी इक्विटी शेअर्सची काही किंमत नाही. आपल्या कुटुंबाच्या ट्रस्टसह जगभरातील कोणत्याही ट्रस्टमध्ये त्यांचे कोणतेही आर्थिक हितसंबंध नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या