Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"हिंमत असेल तर दडवून ठेवलेला…"; देशमुखांचे फडणवीसांना थेट आव्हान

“हिंमत असेल तर दडवून ठेवलेला…”; देशमुखांचे फडणवीसांना थेट आव्हान

मुंबई । Mumbai

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामधील मागील काही दिवसात आरोप प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच “अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत” असा आरोप मुंबईचे निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांनी केला होता .

दरम्यान अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावत सचि वाझेंच्या कुबड्या वापरुन फडणवीस माझ्यावर आरोप करत असल्याची टीका अनिल देशमुखांनी केली. ठाकरेंना अटक करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे समित कदमला पाठवल्याचा गौप्यस्फोट मी केल्यानंतर फडणवीसांनी अशी चाल खेळायला सुरुवात केल्याचे देशमुख म्हणाले. दरम्यान आज देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांना थेट आव्हान दिले आहे.

अनिल देशमुख म्हणाले, ‘माझ्यावर आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना एका दहशवादी, गुन्हेगाराचा वापर करावा लागतोय ही आश्चर्याची गोष्ट आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला माझ्यावर आरोप करायला लावायचे. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनीच सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते. फडणवीसांच्या सांगण्यानुसार तीन वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप केले होते तेव्हा मी स्वत:च माझ्यावरच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावेळच्या सरकारने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश चांदीवाल यांनी त्या प्रकरणाची 11 महिने चौकशी केली. 11 महिने चौकशी केल्यानंतर 2022 मध्येच माझ्यावरील आरोपांचा चौकशीचा अहवाल चांदीवाल यांनी गृहमंत्रालयाकडे दिला आहे. आता फडणवीसांनी जस्टीस चांदीवाल यांनी जो अहवाल सादर केला तो अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा, अशी मागणी मी गेल्या काही दिवसांपासून करत आहे.

1400 पानांचा तो अहवाल आहे. मी मागणी करूनही राज्य सरकार तो अहवाल जनतेसमोर आणत नाही. आताही माझी विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर तो अहवाल जनतेसमोर आणावा, असे अनिल देशमुखांनी म्हटले आहे. तसेच, अनिल देशमुख म्हणाले, ‘सचिन वाझे ज्यावेळी जस्टीस चांदीवाल यांच्या समोर हजर झाले. त्यावेळी त्यांनी अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीए ने तुमच्याकडे पैसे मागितले का, असा असा सवाल विचारला. त्यावेळी अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीएने माझ्याकडे कोणतेही पैसे मागितले नाहीत असा जबाब दिला होता. असे सांगत अनिल देशमुख यांनी जस्टीस चांदीवाल यांच्या सुनावणी वेळी झालेला रोजनामा ( मिनिट्स) सादर केला.

पण देवेद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून सचिन वाझे पुन्हा आरोप करत असतील तर माझ्याबद्दल झालेल्या चौकशीचा अहवाल सादर करावा, अशी मी मागणी करत आहे. दोन खूनाच्या हत्येचा आरोपाखाली सचिन वाझे तुरुंगात आहेत आणि माझ्या विरोधात बोलण्यासाठी ते अशा गुन्हेगार माणसाचा वापर करत आहेत. सचिन वाझे ने जस्टीस चादीवाल यांच्या कोर्टात जो जबाब दिला होता. तेव्हा वाझे नेच सांगितले होते की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही माणसाने माझ्याकडे पैसे मागितले नाहीत, किंवा बाहेरच्या लोकांकडूनही पैसे वसूल करण्यास सांगितले नाहीत. सचिन वाझेने स्वत: हे स्टेटमेंट दिले आहे. हे सांगत असताना त्यांनी त्यावेळच्या वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणेही त्यांनी दाखवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या