मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्यात सध्या समित कदम (Samit Kadam) नावाच्या व्यक्तीबाबत दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण पाहायला मिळत आहे. एकीकडे अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.
तर दुसरीकडे फडणवीसांनीही आपल्याकडे रेकॉर्डिंग्ज आहेत, असा दावा केला आहे. यानंतर अनिल देशमुखांनी समित कदम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला असून त्याचे फडणवीसांशी घरोब्याचे संबंध असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) ते माध्यमांशी बोलत होते.
तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी मिरजेच्या समित कदमला प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे पाठवलं होतं. त्यानेच प्रतिज्ञापत्र करून द्या असं सांगितलं. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितलं. सुमित कदम आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध असून त्यांचे फोटो आहेत. सुमित कदम यांची पत्नी फडणवीस यांना राखी बांधते. असे सांगत अनिल देशमुख यांनी तसे फोटो माध्यमांना दाखवले.
हे ही वाचा : शिंदे गटाचा श्रीरामपूर, नेवासा मतदारसंघांवर डोळा
समित कदम साधारण कार्यकर्ता आहे. तो साधा नगरसेवकही नाही. तरीही त्याला वाय सुरक्षा देण्यात आली. मी जर तीन वर्षांपूर्वी त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या असत्या, असं अनिल देशमुख म्हणाले. तसेच, फडणवीस यांचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव होता. जर मी त्या एफिडेविटवर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये असते, असंही देशमुख म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणासंदर्भातले आरोप होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी ३०० कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले असल्याचा देखील आरोप त्या मध्ये होता, असं देशमुख म्हणाले. हा डाव फसला म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील असाच डाव वापरला. तो यशस्वी झाला. अजित पवारांविरोधात देखील असाच डाव वापरला तो सुद्धा यशस्वी झाला,” असा धक्कादायक दावा देशमुख यांनी केला होता.
हे ही वाचा : शपथविधीवेळी नार्वेकरांकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख; तर गवळी यांची ‘जय…
दरम्यान, दुसरीकडे जनसुराज्य शक्ती युवा प्रदेशाध्यक्ष असलेल्या समित देशमुख यांनी यापूर्वीच देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपावर बोलताना समित कदम म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपल्या अडचणी कमी करता येतात का पाहा अशी विनंती अनिल देशमुखांना केली होती. देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून आपण देशमुखांची भेट घेतली नव्हती. उलट देशमुखांनी बोलावल्यावर आपण त्यांची भेट घेतली होती.
समित कदम पुढे म्हणाले, त्यावेळी अनिल देशमुख हे गृहमंत्री होते त्यांना झेड प्लस सिक्युरिटी होती त्यांनी बोलवल्या शिवाय त्यांना भेटूच शकत नाही. तीन वर्षापूर्वीची भेटीबाबत बोलून त्यांना काय नरेटीव्ह सेट करून टार्गेट करायचं आहे. हे त्यांनाच माहिती त्याच्या घरी भेट झाली यात देवेंद्र फडवणीस यांचा काहीही संबंध नाही असे सडेतोड उत्तर कदम यांनी दिले आहे.
हे ही वाचा : Paris Olympic 2024 : मनू भाकेरने रचला इतिहास; नेमबाजीत मिळवून दिले…