Saturday, November 16, 2024
Homeजळगावअनिल जैन यांना कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान

अनिल जैन यांना कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान

जळगाव – प्रतिनिधी jalgaon
कृषी व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य व मोलाच्या योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक व जैन फार्मफ्रेश फूड्स ली.चे अध्यक्ष अनिल जैन यांना डॉ.डी.वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाच्या वतीने आयोजित सोहळ्यात सोमवारी डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली.

विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान दीक्षांत समारंभात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलपती संजय पाटील, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. के प्रथापन, रजिस्ट्रार डॉ.खोत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
1986 मध्ये अनिल जैन हे वाणिज्य आणि कायद्याची पदवी घेऊन, कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. जो त्यांचे वडील पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी दोन दशकांपूर्वी सुरू केला होता. त्याच वेळी भारतात राहून श्री जैन यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा आणि शेतकर्‍यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान कसे आणता येईल याचा अभ्यास केला.

- Advertisement -

अनिल जैन यांना कौटुंबिक मूल्यांची, सर्व भागधारकांसाठी आणि मोठ्या समाजासाठी मूल्य निर्माण करण्याची तीव्र इच्छा आहे, शेतकर्‍यांसाठी सतत काम करणे, शेतकर्‍यांना प्रथम स्थान देणे आणि त्यांच्या कार्याच्या माध्यमातून भारताचा ब्रँड मजबूत करण्यात मदत करणे.. राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करून अन्न आणि पाणी सुरक्षेकडे नेणार्‍या शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहणे असा त्यांचा ध्यास आहे.

शेतकर्‍यांसाठी करीत असलेल्या कार्याचा गौरव

शेती आणि शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून जैन इरिगेशन गेल्या सहा दशकापासून काम करत आहे, शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आम्ही नवनवीन प्रयोग सातत्याने करीत आहोतच, शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हास्य हाच सर्वात मोठा बहुमान आहे ही भावना भवरलाल जैन यांची होती तीच भावना आज माझी होती, ही पदवी सर्व शेतकरी बांधव आणि सहकारी यांच्यावतीने स्वीकारताना मनस्वी आनंद झाला म्हणून ही पदवी त्यांनाच समर्पित करित आहे.

  • अनिल जैन, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या