Friday, April 25, 2025
Homeजळगावअनिल पाटलांच्या कार्यकर्तृत्वाने अमळनेरची भूमी विकासात्मक झाली!

अनिल पाटलांच्या कार्यकर्तृत्वाने अमळनेरची भूमी विकासात्मक झाली!

अमळनेर । प्रतिनिधी Amalner

संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेली आणि सांस्कृतिक, धार्मिक आणि औद्योगिक वैभव लाभलेली पवित्र भूमी म्हणजे अमळनेर शहर असून सांस्कृतिक व वैचारिक वारसा लाभलेल्या या भूमीला नुकताच महाराष्ट्र शासनाने पुस्तकांचे गाव म्हणून विशेष दर्जा बहाल केला आहे. सर्व जाती धर्माच्या बांधवांना सामावून घेणारी ही उदारमतवादी भूमी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने विकासात्मक झाली असल्याची भावना शहरातून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

यासंदर्भात शहरातील व्यापारी लालचंद सैनानी, भरतकुमार ललवाणी, निलेश भांडारकर, भाईदास महाजन, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, अजय केले, प्रितपाल सिंग बग्गा, बापू हिंदुजा, जितेंद्र भामरे, भाजप शहराध्यक्ष विजय राजपुत, कमल कोचर, दिनेश कोठारी, जूनैद शेख, विजयकुमार जैन, दत्ता कासार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहरात भूमिपुत्र अनिल पाटील यांच्या कर्तुत्वाने भव्य असे महसुलचे प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू असून त्याशेजारीच सर्व शासकीय कार्यालयासाठी प्रशासकीय इमारतीचे कामही होत आहे. यासोबत एस टी डेपोचेही भूमिपूजन होऊन तेही काम सुरू होणार आहे.

मारवड रस्त्यावरील निधी अभावी अडगळीत पडलेल्या क्रीडा संकुलास त्यांनी निधी आणून चालना दिली. त्यांच्या प्रयत्नांनी हॉलचे नूतनीकरण, जॉगिंग ट्रॅक, कंपाऊंड, रंगरंगोटी, दुरस्ती, बास्केट बॉल सह इतर मैदान आदी कामे झाली आहेत. याशिवाय शहराच्या मध्यवर्ती भागात जवळपास सारेच रस्ते नवीन झाले आहेत. शहराच्या चारही बाजूला डी.पी.रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर एकाच रंगाचे जंबो पथदिवे लगल्याने शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे. यामुळेच शहरात सुरू असलेल्या प्रचार फेर्‍यांना मोठा प्रतिसाद लाभत असल्याचेही ते म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...