Thursday, May 21, 2026
HomeनगरAhilyanagar : जनावरांच्या गोचिड तापावर ‘रक्षाव्हॅक टी’ ही उपयुक्त लस

Ahilyanagar : जनावरांच्या गोचिड तापावर ‘रक्षाव्हॅक टी’ ही उपयुक्त लस

जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पशुसंवर्धन विभाग अहिल्यानगर, व इंडियन इम्म्युनालॉजिकल्स लिमिटेड कंपनी हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषदेचे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पार पडली. यावेळी जनावरांच्या गोचिड तापावर ‘रक्षाव्हॅक टी’ ही लस उपयुक्त असल्याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. उमेश पाटील, डॉ. सुनील लहाने उपायुक्त रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. दशरथ दिघे, डॉ. अरुण हरिश्चंद्रे, डॉ. संतोष पालवे, वेंकटरमना, डॉ. सर्वेश तायशेटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. उमेश पाटील म्हणाले जनावरांना विविध प्रकारच्या साथीचे आजार प्रतिबंधक लसीकरण बाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्याचा फायदा दूध उत्पादक शेतकर्‍यांना होईल. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी मुळीक म्हणाले, नगर जिल्हा हा पशुपालन क्षेत्रात आघाडीवर असून राज्यात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. पशुपालकांनी शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादनावरील होणारा खर्च कमी होईल, तसेच पशुपालकांचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल. या प्रकारच्या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पशुपालकांना फायदा होईल. इंडियन इम्म्युनालॉजिकल्सचे विभाग प्रमुख वेंकटरमना यांनी कंपनीच्या माध्यमातून गोचीड ताप हा गोचडीमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून संकरित जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो.

यामुळे इंडियन इम्म्युनालॉजिकल्स कंपनीची या रोगावर रक्षाव्हॅक टी या नावाने लस उपलब्ध असून ही वर्षातून एकदाच जनावरांना द्यायची असते. केंद्र शासन व राज्य शासन यांच्या विद्यमाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लस उपलब्ध असून ती शेतकर्‍यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सूत्रसंचालन सुरेश घुले यांनी केले तर आभार डॉ. संतोष पालवे यांनी मानले.

ताज्या बातम्या

UPSC

UPSC Exam TimeTable: UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! IAS, NDA, CDSसह...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiदेशासह राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोरी आली आहे. Union Public Service Commission म्हणजेच UPSC ने...