Friday, May 31, 2024
Homeजळगावमस्कावद येथे पशुसंवर्धन आयुक्तांनी केली ' लंपी स्कीन' ग्रस्त गुरांची पाहणी

मस्कावद येथे पशुसंवर्धन आयुक्तांनी केली ‘ लंपी स्कीन’ ग्रस्त गुरांची पाहणी

मस्कावद Maskavad ता. रावेर (वार्ताहर)
येथील मस्कावद सिम. (Maskavad Sim) खुर्द व बुद्रुक भागात लंपी स्क्रीन (Lumpy screen) या संसर्गजन्य आजाराचा (Infectious disease) गुरांवर (cattle) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव (Outbreak) झाल्याने येथे दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. अनेक गाई, बैल, वासरे लंपी आजाराने ग्रस्त असल्याने पशुपालक (Cattle breeder) रंडकुंडा झाला आहे. आज 27 रोजी राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त (Commissioner of Animal Husbandry) एस. पी. सिंग तसेच जिल्हा परिषद सीईओ (ZP CEO) डॉ. पंकज आशिया यांच्यासह टीमने भेट देत लंपी बाधित जनावराची पाहणी (Animal inspection) केली.

या वेळेस पशुसंवर्धन आयुक्त एस. पी. सिंग यांनी मृत्यू झालेल्या पशुपालकांची भेट घेऊन तसेच बाधित झालेल्या पशुपालक यांची भेट घेऊन लंपी या संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन औषध उपचार करून स्किन या संसर्गजन्य आजाराचा नायनाट करावा असे सांगून लंबी आजारावर रोगांची लक्षणे व उपाय योजना यांचे मार्गदर्शन केले.

- Advertisement -

यावेळेस पशुपालक सुजित वसंत यशवंत पाटील रत्नाकर पाटील, केशव सरोदे, निळकंठ चौधरी, संदीप चौधरी, विकास पाटील, रितेश वारके, सुधाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र पाटील, मस्कावद बुद्रुक सरपंच सौ पाटील, किरण फेगडे ,विक्रम वारके, दीपक पाटील, यांच्यासह अतिरिक्त अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. परकडे, सीईओ डॉ. पंकज आशिया, पशुवर्धन उपायुक्त शामकांत पाटील, जिल्हा पशुवर्धन अधिकारी डॉक्टर शिसोदे, डॉ, निलेश राजपूत सावदा, डॉ. धांडे खिरोदा, प्रादेशिक उपायुक्त नासिक डॉक्टर नरवाडे, अधिकारी वर्ग उपस्थित होते.

गुरांवर आलेल्या लंपी स्कीन डिसीज या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला असल्याने लंपी स्क्रीन हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरातील डॉक्टर हजर असून लंपी आजाराची लक्षणे दिसण्या अगोदर गोठ्याची स्वच्छता, गोठ्यात जंतुनाशक फवारणी तसेच दोन गुरांमधील अंतर ठेवावे तसेच लक्षणे दिसतात पशुवैद्यकीय अधिकारी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या