Friday, April 25, 2025
Homeनगरगोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करणारा आरोपी जेरबंद

गोवंशीय जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करणारा आरोपी जेरबंद

सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील जुने बसस्थानक परिसरात एका वाहनामध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेले गोवंशीय जनावरांची अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका करून एका इसमास ताब्यात घेतले असून त्याच्या कडून 7 लाख 20 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, 2 मार्च रोजी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अहिल्यानगर ते मनमाड रोडवर राहुरी येथील जुने बसस्थानक येथे एक इसम त्याच्या मालवाहु चारचाकी वाहनामध्ये गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरीता निर्दयतेने डांबुन ठेवुन, वाहनामधुन वाहतुक करत आहे.

- Advertisement -

तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून संशयीत वाहनाचा शोध घेऊन, वाहनामध्ये गोवंशीय जातीचे जनावरे निर्दयतेने डांबुन ठेवल्याचे दिसल्याने संशयीत इसम रियाज रज्जाक सय्यद (वय 25), रा.क्रांतीचौक, राहुरी यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष आरोपीच्या वाहनामधील गोवंशीय जनावराबाबत विचारपूस केली असता त्याने गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असलेबाबत माहिती सांगितली. आरोपीकडून 1 लाख 20 रुपये किमंतीच्या 3 गायी व 1 गोर्‍हा तसेच 6 लाख रुपये किंमतीचा अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो (एमएच 12 केपी 6688) असा एकुण 7 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात ग.ुर.नं 194/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम 5 (अ) सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पो.नि. दिनेश आहेर, पोलीस अंमलदार अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे या पथकाने केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...