Monday, May 27, 2024
Homeनगरकोतवाली हद्दीत एलसीबीने गोमांस पकडले

कोतवाली हद्दीत एलसीबीने गोमांस पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवंशीय जनावरांची कत्तल (Animals Slaughter) करून मास वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (LCB Police) पकडला. एक लाख सहा हजार 500 रूपये किमतीचे गोमांस, पाच लाखाचा टेम्पो असा सहा लाख सहा हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. सोमवारी (दि. 9) रात्री पावणे अकराच्या सुमारास जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

नगरमध्ये मनपाची 12 आरोग्य केंद्रे

याप्रकरणी गुलाब बनीलाल शेख (वय 32 रा. खेड, ता. कर्जत) याच्या विरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सचिन आडबल, शिवाजी ढाकणे, रोहीत मिसाळ, रणजीत जाधव यांचे पथक नगर शहरातील अवैध धंद्यावर कारवाईकामी गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, गुलाब बनीलाल शेख जुन्या जिल्हाधिकारी रस्त्याने चांदणी चौक मार्गे सोलापूर रस्त्याने टेम्पोमधून गोमांस घेऊन जाणार आहे.

ना नेता.. ना अभिनेता…तरीही जोरदार स्वागत

पथकाने सोमवारी रात्री जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सापळा लावला असता संशयित टेम्पो येताच तो पोलिसांनी पकडला. त्या टेम्पोची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये एक लाख सहा हजार 500 रूपये किमतीचे 710 किलो गोमांस मिळून आले. पोलिसांनी टेम्पो, गोमांस जप्त (Seized) केला असून शेख याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर पोलीस अंमलदार मिसाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

अवैध बायोडिझेल विक्रेत्या ढाब्यावर पोलिसांचा छापाअतिक्रमण अन् सरकारी जागेची सर्रास विक्री ?

- Advertisment -

ताज्या बातम्या